कळंब – समय सारथी
गद्दारीत सहभागी झालो नाही म्हणुन विकास कामांना स्थगिती दिली त्याचा विरोधकांना जाब विचारा असे आवाहन करीत आमदार कैलास पाटील यांनी हल्लाबोल केला. देवधानोरा या गावात ग्रामदैवत खंडोबा याचे दर्शन घेऊन खासदार ओमराजे व आमदार कैलास पात यांनी प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ केला. यावेळी भाजपमधुन काही तरुणांनी शिवसेना उबाठा गटात खासदार ओमराजे व आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते प्रवेश केला तसेच एका तरुणाने 11 हजार रुपये निवडणुकीसाठी मदत दिली. यावेळी माजी आमदार दयानंद गायकवाड, राजाभाऊ शेरखाने, पांडुरंग कुंभार, ज्योती सपाटे, मेहबूब पटेल, बळवंत तांभारे, विश्वजीत नरसिंग देशमुख यासह पदाधिकारी उपस्थितीत होते.
उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी दिल्याबद्दल महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आभार मानले. मी देवधानोरा गावात शिकलो आहे त्यामुळे मी इथलाच आहे. सत्ता असताना सुरुवातीच्या काळात वैद्यकीय महाविद्यालय सुरु केले, कळंब येथे कोर्ट मंजुर करुन सुरु केले. अनेक कामे मंजुर केली मात्र सरकार बदलले आणि स्थगिती देण्यात आली. त्यांच्या गद्दारीत सहभागी झालो नाही म्हणून माझ्या कामांना स्थगिती दिली त्यानंतर मी उच्च न्यायालयात गेलो व स्थगिती उठवली त्यामुळे आज ही कामे सुरु झाली. विकास कामांना स्थगिती का दिली यांचा जाब त्यांना विचारा असे आवाहन आमदार कैलास पाटील यांनी केले.
सगळ्या मतदार संघात एसटी गाडी दिली मात्र केवळ मी विरोधात असल्याने कळंब मतदार संघात कळंब आगाराला गाडी दिली नाही. अनेक लोकांना लुटले, महागाई वाढवली व लाडकी बहीण योजना सुरु केली. त्यानंतर खुर्चीची भीती वाटत असल्याने त्यांना लाडकी बहीण योजना आठवली. आपल्या बहिणी सुरक्षित आहेत का ? असा सवाल त्यांनी केला. येत्या काळात अभिमान वाटेल, मान झुकणार नाही असे काम करेल असे आश्वासन आमदार पाटील यांनी दिले.
निष्ठा, विश्वास काय असते हे कैलास पाटील यांच्याकडुन शिकावे. कॅबिनेट आणि राज्य मंत्री पद व 50 कोटी खोक्यावर लाथ मारून ते शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या एकनिष्ठ व सोबत राहिले. ज्या गावात कैलास पाटील यांनी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षण घेतले त्या गावातून प्रचाराला सुरुवात केली. माणुस कृतीतुन ओळखू येतो, मी त्या गोष्टीचा साक्षीदार आहे. 5 हजार कोटीचा विकास केला असे सांगत आहेत मात्र विकास कुठे दिसत नाही, मी तो शोधणार आहे. 5 वर्षात आमदार कैलास पाटील यांनी ताकतीने विकास काम केले. त्या निष्ठेच्या व कामाच्या ताकतीवर त्यांना राज्यातून सर्वाधिक मतांनी निवडुन द्यावे असे आवाहन ओमराजे निंबाळकर यांनी केले.
माझ्या घरातील व्यक्तीपेक्षा कैलास पाटील हे जास्त प्रामाणिक राहिले. खोके आणले नाही तर द्यायचे कुठे ? आमच्याकडे पैसे कमी आहेत. ईडीने एकनाथ शिंदे यांच्या जवळचा माणुस ताब्यात घेतला तेव्हा एकनाथ शिंदे यांनी पक्ष फोडून भाजप सोबत केले. मोदी म्हणाले के 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा केला व त्याच अजित पवारला सोबत घेतले व मंत्री केले. मोदी यांनी वेदांता सह अनेक प्रकल्प गुजरात येथे नेले त्यामुळे 2 लाख रोजगार बुडाले. उद्या सरकार महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे त्यासाठी त्यांना निवडुन द्या. 11 हजाराचे सोयाबीन 3 ते 4 हजाराने विकावे लागत आहे. सगळ्या नेत्यांच्या संपत्ती वाढल्या. नेतृत्व चांगले स्वीकारले नाही तर काय होते हे लातुर व धाराशिव येथे पहा, लातुर नंतर जिल्हा होऊनही विकास झाला. मागास जिल्ह्याच्या यादीत धाराशिवचा 3 रा नंबर आहे असे ओमराजे म्हणाले.
महागाई वाढवली आहे, बहीण लाडकी असती तर अडीच वर्षापुर्वीच लाडकी बहीण लागु केली असती. सत्तेत आल्यावर उद्धव ठाकरे यांनी वाट न पाहता कर्जमुक्ती केली. भाजप, शिंदे व पवार यांना सत्तेसाठी लाडकी बहीण योजना सुरु केली. लोकसभेला पैशाची अतिवृष्टी झाली आताही तसेच आता विधानसभा निवडणुकीत होणार आहे. पैशाचा महापूर येणार आहे, पैसे देणार आहेत त्याचा पाऊस पडणार आहे पण मतदारांनी कैलास पाटील यांना भुमीपुत्र म्हणुन निवडुन द्यावे असे आवाहन ओमराजे निंबाळकर यांनी केले.