धाराशिव – समय सारथी
धाराशिव तालुक्यातील येडशी येथे जंगल सफारी, तुळजापूर येथे प्राणीसंग्रहालयासह जिल्ह्यात विविध 34 प्रकल्प टप्प्याटप्याने राबविले जाणार असुन त्यासाठी नोडल अधिकारी नेमण्यात आले आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून धाराशिवचा विकास होणार असुन चेहरा बदलणार आहे असे आमदार राणाजगजीतसिंह पाटील म्हणाले. प्रकल्पाची संख्या 50 पर्यंत नेली जाणार असुन देश विदेशातील व स्थानिक नागरिक, पत्रकार यांनी इच्छा असेल तर यात सहभागी व्हावे, पाठपुरावा करावा असे आवाहन पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले. महास्ट्राईडच्या माध्यमातून आर्थिक विकास करायचा असल्याचे ते म्हणाले.
येडशी अभयारण्यात 15 किमी जंगल सफारी ट्रॅक तयार करण्यात येणार असुन हे काम 3 महिन्यात डिसेंबर पर्यंत करण्यात येणार आहे. या भागातील जंगली प्राणी पर्यटकांना पाहता यावे यासाठी सुरुवातीला सफारी करण्यासाठी जीप्सी भाड्याने घेण्यात येणार आहेत. यामुळे लोकांना रोजगार व विकास कामे होणार आहेत. इथे होणाऱ्या विकास कामांचा प्रकल्प अहवाल आला आहे.
तुळजापूर येथे प्राणी संग्रहालय सुरु करणे करण्यात येणार असुन मोरडा येथे सिंह, वाघ, माकड,कोल्हे,वानर यासह अन्य प्राणी आणले जाणार आहेत. भविक तुळजापूरला येतात त्यामुळे त्यांना इथले प्राणी पाहता येणार आहेत. तुळजापूरला आलेला भाविक इथे 2 दिवस राहावा असे नियोजन आहे, त्याला या प्रकल्पामुळे बळकटी मिळणार आहे. प्रारूप आराखडा तयार करण्यात आला आहे, जागा पाहणी व अंतिम करणे अशी याची सध्याची स्तिथी आहे. राज्य व केंद्र सरकार मदत कदाचित पीपीपी मॉडेल पाहून हे केले जाणार आहे.
येडशी येथील जंगल सफारीत पर्यटक यांना तिथे कोणते प्राणी पाहायला मिळतील याची माहिती वन विभागाला आहे. तिथे एक वाघ आल्याचे मला माहिती आहे. मला तिथे संधी मिळाली तर जायला आवडेल. निवास, नाश्ता, घोडस्वारी असे नियोजन आहे. पहिल्या टप्प्यात 5 कोटी निधी अपेक्षित आहेत त्यातून अनेक विकासकामे होणार आहेत. तुळजापूर कुंकू, कवड्याची माळ,कुंथलगिरी पेढा, मटण रस्सा, हे सगळे ‘आद्या’ या नावाने सगळे विकले व प्रसिद्ध केले जाणार असल्याची संकल्पना मांडली.