धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील भुम शहरात 31 जुलै ते 3 ऑगस्ट या काळात जमावबंदीचे आदेश पोलीस अधीक्षक तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी शफकत आमना यांनी लागु केले आहेत. जयंती कोणाच्या हस्ते साजरी कराव या मुद्द्यावरून तीनही गटांमध्ये मतभेद निर्माण झाले असुन तिन्ही गट आपआपल्या भुमिकेवर ठाम आहेत, वादाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
भुम शहरातील मातंग समाजाच्या समाजमंदिरासमोर दरवर्षीप्रमाणे यावर्षीही साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यासाठी मातंग समाजातील तीन वेगवेगळ्या गटांनी परवानगी मागितली होती. या पार्श्वभूमीवर पोलीस ठाण्यात दोन वेळा बैठक घेऊन तणाव टाळण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र जयंती कोणाच्या हस्ते साजरी कराव या मुद्द्यावरून तीनही गटांमध्ये मतभेद निर्माण या मतभेदामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, पोलीस अधीक्षक तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी शफकत आमना यांनी आण्णाभाऊ साठे नगर, मातंग समाज मंदिर परिसरातील 30 मीटर परिघीय क्षेत्रात जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत.
हा आदेश 31 जुलै ते 3 ऑगस्ट या काळात लागू राहणार आहे. या कालावधीत चार किंवा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई असेल. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 223 अंतर्गत कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. सामान्य नागरिकांनी शांतता राखावी आणि आदेशाचे पालन करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.