धाराशिव – समय सारथी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे तुळजापूर हे उद्योग व्यवसाय ऐवजी अवैध धंद्याचे हब बनले असुन ड्रग्ज, क्रिकेट सट्टा यामुळे अनेकांचे आयुष्य बरबाद होते संसार उध्वस्त झाले आहेत. दुर्दैवाने तुळजापूर येथे अनेक अवैध सुरु असुन पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी यात लक्ष देत कारवाई करणे गरजेचे आहे. ड्रग्ज नंतर पोलिसांनी IPL क्रिकेट सट्टा बाजाराकडे लक्ष देत पोलखोल केले आहे, सट्टा बाजाराचा मास्टर माईंड कोण ? याची उकलं होणे गरजेचे आहे. पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी धाराशिव जिल्हा अवैध धंदे व गुन्हेगारी मुक्तीचा संकल्प केला असुन ड्रग्ज तस्करी रॅकेट त्यानंतर मसाज पार्लर ‘लगाम’ व आता क्रिकेट मॅचचा सट्टा कांड उघड केले आहे. क्रिकेट सट्टा, ड्रग्ज यामुळे अनेकांनी आत्महत्या केल्या असल्याची चर्चा आहे.
धाराशिव पोलिसांनी चेन्नई विरुद्ध राजस्थान या आयपीएल मॅचवर सुरु असलेल्या सट्टा बाजाराची पोलखोल केली असुन कारवाई केली आहे. ड्रग्जनंतर तुळजापुर येथे सट्टा बाजाराची पोलखोल करण्यात पोलिसांना यश आले असुन त्याचा मास्टर माईंड व त्याच्या मुळापर्यंत जाणे हे पोलिसांसाठी एक आव्हान आहे. स्थानिक गुन्हे शाखेने ही कामगिरी केली असुन अमोल रमेश निंबाळकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार आदेशाने सपोनि सचिन खटके, पोहेका जानराव, पोना जाधवर, मपोको होळकर यांच्या पथकाने कारवाई केली.
पोलिसांना गोपनीय माहिती कळाली की, तुळजापूर शहरातील शुक्रवार पेठ येथील भोसले गल्ली येथील प्रमोद रमेश कदम याचे राहते घरासमोर कटयावर बसुन आयपीएल 2025 या क्रिकेट लीगमधील चेन्नई विरूध्द राजस्थान या मॅचवर होणारे अंदाजीत स्कोर व हार जीत यावर कमी पैशात जास्त पैशाचे आमीष दाखवुन आयपीएल सटटा हा मोबाईलवर खेळत व खेळवीत आहे, त्यानुसार कारवाई केली व मोबाईल, सट्टामध्ये पैसे लावण्यात आलेले रजिस्टर असे इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. आरोपी प्रमोद कदम विरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे फिर्याद देण्यात आली आहे.