धाराशिव – समय सारथी
हवामान विभागाकडून दिलेल्या ऑरेंज अलर्टनुसार धाराशिव जिल्ह्यातील सर्व शाळांना 27 सप्टेंबर रोजी शनिवारी सुट्टी जाहीर करण्यात आल्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांनी याबाबत माहिती दिली आहे.
हवामान विभागाकडून 27 सप्टेंबर रोजी धाराशिव जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, संभाव्य मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद धाराशिव यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या/सर्व माध्यमाच्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.