धाराशिव – समय सारथी
अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना राज्य सरकार तातडीची मदत देते या तातडीच्या मदतीच्या वाटपाला धाराशिव जिल्ह्यात सुरुवात झाली असुन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी अन्न धान्य कीट व चेक दिले.
धाराशिव जिल्ह्यातील सर्व तहसीलदार यांना तातडीची मदत वाटप करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले असुन त्यानुसार यादी बनवून वाटप सुरु आहे.तात्काळ मदत कशी देता येईल याला प्रशासन प्राधान्य देताना दिसत आहे.
भुम परंडा वाशी तालुक्यासह धाराशिव जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीबाबत जिल्हाधिकारी यांनी सर्व विभागांचा आढावा घेतला तसेच बाधित गावांची पाहणी करून आवश्यक त्या सूचना दिल्या. यावेळी वडनेर गावातील पुरामुळे बाधित 34 लोकांना 5 हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले.
रुई येथील लोकांना अन्नधान्य किट वाटप करण्यात आले. वागेगव्हाण येथील नुकसानाची पाहणी केली तसेच तुळजाभवानी मंदिराकडून प्राप्त साड्यांचे वाटप करण्यात आले. लाखी तालुका परंडा येथील पूरग्रस्त बाधित 27 कुटुंबांना दहा किलो गहू व दहा किलो तांदूळ वाटप करण्यात आले आहे.