कळंब – समय सारथी, अमर चोंदे
सप्टेंबर महिना कळंब तालुक्यासाठी आपत्तीजनक ठरत असून, गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने तालुक्यात थैमान घातले आहे. नदी-ओढ्यांना आलेल्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला घराचे नुकसान असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघड दिली होती, त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र शनिवारी मध्यरात्री अचानक पुन्हा जोरदार पाऊस कोसळू लागल्याने परिस्थिती पुन्हा बिकट झाली आहे. नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून, ओढ्यांना देखील पूर आला आहे.
खामसवाडी, मंगरुळ, ईटकूर, संजितपूर, दहिफळ आदी गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. तर खामसवाडी–कळंब, खामसवाडी–गोविंदपूर, खामसवाडी–मगरुळ या मुख्य रस्त्यांवरील पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद आहे. भोगजी–कळंब रस्त्यावरील आथर्डी येथील नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले असून, जवळच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पुरामुळे अनेक शेतकरी हवालदिल झाले आहेत. अनेकांची पिके वाहून गेली असून, काहींना घर सोडून सुरक्षित स्थळी जावे लागले आहे..
प्रशासन सतर्क, मात्र धोका कायम
स्थानिक प्रशासनाने खबरदारीचे उपाय सुरू केले NDRF ची टीम कळंब तालुक्यासाठी सज्ज ठेवण्यात आले आहेअसले तरी पावसाचा जोर ओसरत नसल्याने नागरिकांनी खबरदारी बाळगावी असे आवाहन तहसीलदार हेमंत ढोकले यांनी यांनी केले आहे.