धाराशिव – समय सारथी
अतिवृष्टी अनुदान 2024 साठी व्हीके नंबर सहित केवायसीसाठी याद्या उपलब्ध, शेतकरी बांधवाने तातडीने ई केवायसी करून घ्यावे जेणेकरून अनुद्वान त्वरित जमा होईल असे आवाहन शेतकरी नेते अनिल जगताप यांनी केले आहे.
अतिवृष्टी अनुदान 2024 च्या संदर्भात 29 जुलै रोजी शासन निर्णय झाला होता दोन महिने उलटूनही शेतकऱ्यांना अनुदान मिळत नव्हते म्हणून शेतकरी नेते अनिल जगताप यांनी सहा ऑक्टोबर रोजी लोहारा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचा इशारा दिला होता लोहारा उमरगा तालुक्यातील 79 हजार 880 शेतकऱ्यांना 86 कोटी 34 लाख 46 हजार रुपये मंजूर झालेले आहेत.
शेतकरी नेते अनिल जगताप यांच्या इशारानंतर दोन्ही तालुक्यातील महसूल प्रशासन अलर्ट मोडवर येऊन तातडीने याद्याचे कामकाज पूर्ण करून याद्या मंत्रालयामध्ये पाठवून त्याची मंजुरी घेऊन विके नंबर जो एक विशिष्ट नंबर असतो केवायसीसाठी तो तातडीने सर्व शेतकरी बांधवांना उपलब्ध करून देण्यात आला आहे उमरगा तालुक्यातील इ केवायसी करण्याची प्रक्रिया दोन दिवसापूर्वी सुरू झाली होती.
लोहारा तालुक्यातील सर्व याद्यांना मंत्रालयातून मंजुरी मिळाल्यानंतर तहसीलदार रणजीत सिंह कोळेकर यांनी तातडीने त्या याद्या शेतकऱ्यांना वीके नंबर सहित ही केवायसाठी उपलब्ध करून दिलेले आहे प्रत्येक गावातील माननीय तलाठी यांच्याकडे या याद्या उपलब्ध आहेत शेतकरी बांधवांनी आपला विशिष्ट वी के नंबर घेऊन तातडीने एक केवायसी करून घ्यावी जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावरती अनुदान तातडीने जमा होईल.
शेतकरी नेते अनिल जगताप यांनी गेली वर्षभर अनुदान मंजूर करून घेऊन ते शेतकऱ्याच्या पदरात तातडीने कसे पडेल याबाबत नेहमीच प्रयत्न केले. उमरगा तालुक्यातील 49885 शेतकऱ्याच्या खात्यावरती 52 कोटी 75 लाख रुपये तर लोहारा तालुक्यातील 30 हजार 682 शेतकऱ्यांच्या खात्यावरती 32 कोटी 70 लाख रुपये जमा होणार आहेत.
ऐन अतिवृष्टीच्या कालखंडात शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज होती आणि जगताप यांनी वर्षभर प्रयत्न करून आणलेल्या या अनुदानामुळे थोड्या प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे त्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे. शासकीय नियमानुसार प्रति हेक्टर 13,600 व तीन हेक्टरची मर्यादा आहे. मात्र प्रत्येक शेतकऱ्याचे बाधित क्षेत्र आणि नुकसानीची टक्केवारी यानुसार प्रत्येकाला हे अनुदान वेगवेगळे असू शकते.
प्रत्येक शेतकरी बांधवांनी तातडीने आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेऊन आपल्या खात्यावर अनुदान लवकरात लवकर कसे पडेल याबाबत दक्षता घ्यावी असे आवाहन अनिल जगताप यांनी शेतकरी बांधवांना केले आहे.