धाराशिव – समय सारथी
वसंतदादा बँक घोटाळ्यात चेअरमन तथा मुख्य सूत्रधार आरोपी विजय नाना दंडनाईक यांच्या जामीन अर्जावर सोमवारी जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार असुन ते सध्या धाराशिव येथील जेलमध्ये आहेत. शरणागती पत्कारल्यानंतर पोलिसांनी त्यांना 22 जानेवारी रोजी अटक केली होती.बँक घोटाळ्यातील इतर संचालक फरार असुन पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी शोधमोहीम व धाडसत्र सुरु केल्यावर विजय दंडनाईक हे स्वतःहून आर्थिक गुन्हे शाखेसमोर हजर झाले, त्यांनंतर त्यांना अटक करण्यात आली. गुन्हा नोंद झाल्यापासून तब्बल 6 महिने ते फरार होते त्यांचा जामीन जिल्हा व संभाजीनगर उच्च न्यायालयाने नाकारला होता त्यानंतर ते पोलिसांना शरण आले.
वसंतदादा बँक घोटाळ्यात जवळपास 18 आरोपी पैकी एकाही आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नव्हते, या घोटाळ्यातील ही पहिली अटक आहे. ज्यादा व्याजाचे आमिष दाखवून ठेवीदार यांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी कलम 420,409,34 सह महाराष्ट्र ठेवीदारांचा वित्तीय संस्था मधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम कलम 3 व 4 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. प्रभात सहकारी बँकेने 1 कोटी 81 लाख ठेवले होते त्यांना 2 कोटी 31 लाख देणे असताना ते मुदत संपूनही दिले नाही त्यामुळे 28 जुलै 2023 रोजी गुन्हा नोंद केला आहे.
वसंतदादा बँक घोटाळ्यातील आरोपी
पृथ्वीराज विजय दंडनाईक, सुरेखा विजय दंडनाईक, गणेश दत्ता बंडगर, रामलिंग धोंडीअप्पा करजखेडे, शुभांगी प्रशांत गांधी, कमलाकर बापूराव आकोसकर,गोरोबा झेंडे, हरिश्चंद्र शेळके, इलाही बागवान, प्रदीप कोंडीबा मुंडे, लेखापरीक्षक भीमराव ताम्हाणे,विष्णुदास रामजीवन सारडा, व्यवस्थापक दीपक देवकते, महादेव गव्हाणे,लक्ष्मण नलावडे, सुरेश पांचाळ, नीलम चंपतराय अजमेरा हे आरोपी आहेत.