धाराशिव – समय सारथी
धाराशिव की उस्मानाबाद व छत्रपती संभाजीनगर की औरंगाबाद या नामकरणाची सुनावणी पुर्ण झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेवर सुनावणी पुर्ण झाली असुन हे प्रकरण निकालासाठी ठेवले राखीव ठेवले आहे त्यामुळे कोर्ट कधीही निकाल जाहीर करू शकते. मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय व अरिफ डॉक्टर या दोन न्यायमुर्तीच्या खंडपीठाने निकाल राखीव ठेवला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धाराशिव तर औरंगाबाद जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आल्याच्या विरोधात ऍड सतीश तळेकर मार्फत जनहित याचिका दाखल केली आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिंदे भाजप सरकारने 16 जुलै 2022 रोजी नामातरण निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हा निकाल महत्वाचा असुन नागरिकांचे लक्ष लागले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हा न्यायालय, जिल्हा परिषद, पोलीस, महसूल विभागात सध्या धाराशिव नाव वापरले जात असुन सर्व कार्यालयाचे बोर्ड बदलले आहेत. अनेक ठिकाणी नामकरण नंतर बदल करण्यात आले आहेत. धाराशिव जिल्ह्याचे नाव झाले असले तरी जनगनना व मतदार संघ पुनर्बंधणी न झाल्याने लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मात्र उस्मानाबाद हे नाव वापरले जाणार असल्याचे निवडणुक आयोगाने स्पष्ट केले आहे.
धाराशिव उस्मानाबाद नामांतरण विरोधात मसुद ईस्माईल शेख,कादरखान, नगरसेवक खलिफा कुरेशी,आयाज हारून शेख,जफर अली मोमिन,असद खान पठाण, ईस्माईल बाबा शेख, वाजिद पठाण निजामोद्दीन बाबा मुजावर, बिलाल तांबोळी, मन्नान काझी आतिक शेख, समियोद्दीन मशायख, अफरोज पिरजादे, ईम्तियाज बागवान व ईलियास पिरजादे यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली.
मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिंदे भाजप सरकारने 16 जुलै 2022 रोजी उस्मानाबादचे धाराशिव नामातरण करण्याचा निर्णय घेतला यापूर्वी ठाकरे महाविकास आघाडी सरकारने नामांतरण निर्णय घेतला मात्र सरकार अल्पमतात असताना हा निर्णय घेतल्याने कायदेशीर पेचप्रसंग नको म्हणून तो पुन्हा घेण्यात आला.काँग्रेस राष्ट्रवादी व शिवसेना या महाविकास आघाडी सरकारने 29 जुन 2022 रोजी मंत्रिमंडळ बैठकीत नामकरण निर्णय घेतला, या निर्णयाला काँग्रेस राष्ट्रवादीने सहमती दिली होती.