पुणे – समय सारथी
आरोग्यवर्धक शिवजयंतीचा संकल्प राज्याचे आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी केला असुन 19 फेब्रुवारी ते 4 मार्च दरम्यान मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र पंधरवडा राबविण्यात येणार आहे. या पंधरवाड्यात 1 लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार असुन यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. महाआरोग्य शिबीर नंतर हा एक मोठा उपक्रम ठरणार आहे.
डोळ्यातील लेन्स धुसर किंवा पांढरा होणे म्हणजे मोतीबिंदु होय. कोणत्याही प्रकारची वेदना न होता दृष्टी कमी होत जाणे. चशम्याचा नंबर बदलणे. मोतीबिंदूचा वयोमानानुसार दोन्ही डोळ्यावर प्रभाव पडतो. मोतीबिंदूवर कृत्रिम भिंगारोपण हा पर्याय उपलब्ध आहे. शासकीय रुग्णालयात व मान्यता प्राप्त स्वयंसेवी संस्था रुग्णालयात मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केला जाणार आहेत. शस्त्रक्रियेसाठी आशा, आरोग्य कर्मचारी व शासकीय रुग्णालयात संपर्क साधावा असे आवाहन आरोग्यमंत्री डॉ सावंत यांनी केले आहे. मोफत सल्लासाठी 104 टोल फ्री सेवा सुरु केली आहे.
राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी शिणता नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत राष्ट्रीय नेत्र ज्योती अभियान राबविण्यात येणार असुन मोतीबिंदु मुक्त महाराष्ट्र केला जाणार आहे. मोतीबिंदुने गेली दृष्टी कृत्रिम भिंगारोपणाने पहा सृष्टी असा नारा देत हे अभियान राबविले जाणार आहे.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या उपक्रमातील 700 पैकी 347 दवाखाने सुरू झाले असून उर्वरित दवाखाने सुरू करण्याबाबतच्या बाबी पूर्ण करून त्यासंबंधी पुढील नियोजन करण्याच्या सुचना मंत्री सावंत यांनी दिल्या.
पुढील 15 दिवसात करावयाच्या महत्त्वपूर्ण गोष्टी
प्रत्येक जिल्ह्यात हिमोफेलिया केअर सेंटरची स्थापना करणे. त्यासाठी आवश्यक ते औषधे उपलब्ध करणे. अलीकडच्या काळात कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेत, त्यासाठी कर्करोग शोध व उपचार मोहीम राबवण्यात येणार असून यामध्ये स्तनाचा, तोंडाचा, गर्भाशयाच्या मुखाचा आदि कर्करोगावर उपचार करण्यात येणार असुन या मोहिमेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल असे आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी सांगितले.