सीसीटिव्ही रेकॉर्डिंग, बायोमेट्रीक्स हजेरी, आयरीस तपासणी सुविधा व कागदपत्रे पडताळणी – 2 मार्चपर्यंत प्रक्रिया पुर्ण होणार
पुणे – समय सारथी
सार्वजनिक आरोग्य विभागातील रिक्त पदांचा अनुशेष दूर करण्यासाठी आणि पदावरील आरोग्य कर्मचाऱ्यांचा भार हलका करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने गतवर्षी नोव्हेंबर, डिसेंबर मध्ये घेण्यात आलेल्या आरोग्य विभागातील 10 हजार 949 रिक्त पदे गट ‘क’ व ‘ड’ संवर्गातील भरती प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात असून, परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याचे काम मंडळ निहाय अगदी पारदर्शक पद्धतीने सुरू आहे. त्याच भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने ‘आरोग्य भवन पुणे’ येथे आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी उपस्थित राहून काही निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती पत्र दिले व उर्वरित नियुक्त्या देखील लवकरच देण्यात येणार आहेत.
नौकर भरती प्रक्रिया गतीने व पारदर्शकपणे पूर्ण करण्यासाठी भरती कंपनीच्या प्रतिनिधी समवेत वेळोवेळी बैठका घेऊन संपूर्ण प्रक्रिया पारदर्शी आणि सुरळीत पडण्याविषयी निर्देश दिले होते. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यासाठी ‘टीसीएस’ या एजन्सीची निवड करण्यात आली होती. परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता येण्यासाठी टिसीएसकडून सीसीटिव्ही रेकॉर्डिंग, बायोमेट्रीक्स हजेरी, आयरीस तपासणी सुविधा वापरण्यात आल्या होत्या. परीक्षेत होणारा गैरप्रकार रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व व्यवस्था देखील राबवण्यात आल्या होत्या.
निवड यादीतील उमेदवारांचे बायोमॅट्रीकव्दारे घेतलेल्या हाताच्या बोटांचे ठसे व फोटो कागदपत्रे पडताळणीच्या वेळी प्रतिनिधींमार्फत उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. तेव्हा बायोमॅट्रीकव्दारे घेतलेले ठसे व प्रत्यक्ष उपस्थित उमेदवारांचे बोटांचे ठसे व फोटो आयडी यांची अंतिम तपासणी देखील करण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेतील पात्र उमेदवारांना विभागाच्या वतीने संपूर्ण सहकार्य करण्यात येत आहे. तसेच उमेदवारांना असणाऱ्या विविध समस्यांचे निवारण करण्यात येत असून, एकूण सुरवातीपासूनच ही भरती प्रक्रिया अगदी पारदर्शी आणि विनाविलंब पार पाडण्यात आली आहे.
पारदर्शी भरती साठी परीक्षेत होणारा गैरप्रकार रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व व्यवस्था राबवण्यात आल्या होत्या. परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी विभागनिहाय राज्यभर सुरू असून पुणे विभागातील आरोग्य भवन , राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग , प्रभोधन हॉल पुणे येथे या विभागातील समुपदेशन व नियुक्तीचे आदेश तात्काळ देण्यात आले आहेत. यामध्ये उमेदवारांना विभागाच्या वतीने संपूर्ण सहकार्य करण्यात आले. उमेदवारांना असणाऱ्या विविध समस्यांचे निवारण करण्यात येत असून, एकूण सुरवातीपासूनच ही भरती प्रक्रिया अगदी पारदर्शी आणि विना विलंब पार पाडण्यात आली. ही भरती प्रक्रिया २ मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या मेगा भरतीच्या पूर्ततेनंतर मनुष्यबळाअभावी आरोग्य व्यवस्थेवर पडत असलेला ताण कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच राज्यातील नागरिकांना विनाविलंब व सुलभ आरोग्य सुविधा पुरविणे शक्य होणार आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी हि भरती प्रक्रिया महत्त्वाची ठरणारं आहे.
यावेळी उमेदवारांनी भरती प्रक्रिये बाबत समाधान व्यक्त केले व आपले मनोगतही व्यक्त केले व आरोग्यमंत्री सावंत यांचे आभार मानले. यावेळी आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ राधाकिशन पवार यांनी भरती प्रक्रियेची माहिती दिली.