एकच ग्वाही, तपासणीपासुन शस्त्रक्रियेपर्यंत सर्वकाही – आरोग्यमंत्री डॉ सावंत यांचा पुढाकार, आरोग्याचा जागर
धाराशिव – समय सारथी
उत्सव नवरात्रीचा महाराष्ट्राच्या आरोग्याचा,एकच ग्वाही, तपासणीपासुन शस्त्रक्रियेपर्यंत सर्वकाही असा नारा देत आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून तुळजाभवानी नवरात्र उत्सवात 27 ते 29 ऑक्टोबर या काळात 3 दिवसांचे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभाग आयुष्यमान भव अंतर्गत महाआरोग्य शिबिराची तयारी पुर्ण झाली असुन उदघाट्न 27 ऑक्टोबर रोजी मान्यवर यांच्या हस्ते होणार आहे.
महाआरोग्य शिबिरास अनेक तज्ज्ञ डॉक्टर रुग्णसेवा बजावणार आहेत. पंढरपूर येथे वारीच्या काळात देखील असेच महाआरोग्य शिबीर घेतले होते त्याच धर्तीवर आता तुळजाभवानी नवरात्र काळात पहिल्यांदा असे भव्य दिव्य महाआरोग्यशिबीर होत आहे. हे शिबीर घाटशीळ पायथा सोलापूर रोड येथे घेण्यात येणार आहे तरी भाविक, नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी केले आहे.
महाआरोग्य शिबिरात मोफत निदान व औषध उपचार, टेली कन्सलटेशन, स्क्रिनिंग, आभा व आयुष्यमान ओळखपत्र तयार करणे,प्रसूती व स्त्री रोग, कान नाक घसा, स्वच्छता अभियान आयुष्यमान मेळावा, रक्तदान व अवयवदान जनजागृती मोहीम, आयुष्यमान सभा व आयुष्यमान आपल्या दारी, अंगणवाडी व प्राथमिक शाळामधील 18 वर्षा खालील मुलांची तपासणी केली जाणार आहे.
18 वर्षावरील सर्व पुरुषांची मोफत सर्वकश आरोग्य तपासणी करण्यात येणार असुन आवश्यकतेनुसार मोफत शस्त्रक्रिया, मोठ्या शस्त्रक्रिया आवश्यकता असल्यास रुग्णांना महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनाचा लाभ व ई संजीवनी टेली कन्सलटेशन माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर यांच्याशी संवाद साधून सुविधा उपलब्ध केल्या जातील.