धाराशिव – समय सारथी
गुरुपौर्णिमेनिमित्त महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक राज्यांतून आलेल्या भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या असुन विशेष पुजा व सजावट करण्यात आली आहे.
गुरुपौर्णिमेच्या दिवशी आई तुळजाभवानीला ‘गुरू’ मानणारे भाविक खास पूजा-अर्चा करून दर्शन घेतात. ‘आई राजा उदो उदो’ चा जयघोष करत श्रद्धेने भक्तांनी देवीचं दर्शन घेतले. अनेक भक्तांनी पौर्णिमेच्या मुहूर्तावर तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक होत दर्शनाचा लाभ घेतला.