धाराशिव – समय सारथी
राज्याचे परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांचे वेगळे रूप पहायला मिळाले, गाडी ताफा मागे ठेवत सरनाईक स्वतः जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलिस अधीक्षक रितू खोखर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यासह पायी चालत आले.
तुळजाभवानी मंदिरासमोर व्हीआयपी गाड्या व ताफा यामुळे वाहतुकीची कोंडी होत होती, त्याचा भाविकांना नाहक त्रास होत होता त्यामुळे पालकमंत्री सरनाईक यांनी स्वतःसहेल कोणत्याही नेते, अधिकारी, व्हीआयपी यांच्या गाड्या प्रवेशद्वारापर्यंत सोडायच्या नाहीत असे जाहीर केले त्याची अंमलबजावणी स्वतः करणार असे त्यांनी मागील 15 ऑगस्ट दौऱ्यात जाहीर केले. त्याप्रमाणे 16 सप्टेंबर रोजी ते मंदिरात आढावा घेण्यासाठी आले असताना त्यांनी बोलल्या प्रमाने पालन केले.
मी स्वतः जाहीर केले होते की लोकांना गाड्या आणू नका आणि मी ते पाळले. स्वतःपासून सुरुवात केली, मी जे बोललो ते विसरलो नव्हतो. दुसऱ्याला तत्वज्ञान सांगने व वेगळे वागणे हा माझा स्वभाव नाही असे ते पत्रकार यांच्याशी बोलताना म्हणाले. बोलें तैसा चाले या निमित्ताने प्रत्यय आला, सर्वांनी गाड्याचा नियम पाळावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.