धाराशिव – समय सारथी
पालकमंत्री प्रतापराव सरनाईक 22 नोव्हेंबर रोजी शनिवारी धाराशिव येथे “धाराशिव जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका” अनुषंगाने पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक घेणार असुन ते काय बोलतात व भुमिका जाहीर करतात याकडे लक्ष लागले आहे.
धाराशिव जिल्ह्यात भाजप शिवसेना युतीची घोषणा पालकमंत्री सरनाईक व भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी मुंबई येथून केली होती. मात्र धाराशिवसह कोठेही युती झाली नाही, त्यावर ते काय बोलतात हे पाहावे लागेल. धाराशिव नगर परिषद निवडणुकीत उलट भाजपने पाठीत खंजीर खुपसून धोका दिला व फसवले अशी प्रतिक्रिया शिवसेना जिल्हा प्रमुख सुरज साळुंके यांनी दिली. शिवसेना आता पक्ष म्हणुन काय भुमिका घेणार हे पाहावे लागेल.











