मुंबई – समय सारथी
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे यांनी मुंबई येथे आमरण उपोषण सुरु केले होते, ते उपोषण यशस्वी झाले असुन 1 तासात राज्य सरकार 3 वेगवेगळे शासन आदेश जीआर काढणार आहे. हे जीआर काढल्यानंतर जारांगे आंदोलन मागे घेणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. हैद्राबाद गॅझेट, सातारा गॅझेट व इतर मागण्याचा तिसरा वेगळा आदेश काढला जाणार आहे. हैद्राबाद गॅझेट लागु करण्याचे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महायुती सरकारला जाणार आहे.
हैद्राबाद गॅझेट तात्काळ तर सातारा गॅझेट अंमलबजावणीसाठी 1 महिना मुदत देण्याचे मान्य केले. शिष्टमंडळात मंत्री शिवेंद्र राजे भोसले, जयकुमार गोरे, प्रतापराव सरनाईक,माणिकराव कोकाटे, उदय सामंत यांच्यासह धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरचे भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील उपस्थितीत होते.
राधाकृष्ण विखे पाटील. यांच्या नेतृत्वाखाली मंत्री, आमदार यांचे शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांना भेटले व सविस्तर चर्चा करून जरांगे यांची मसुद्यावर संमती घेतली त्यानंतर राज्य सरकार 3 जीआर काढणार आहे. जीआर निघाल्यावर मराठे रात्री 9 पर्यंत आनंद उत्सव साजरा करून मुंबई रिकामी करून गावी परत जातील असे म्हणाले.