धाराशिव – समय सारथी
गणेशोत्सवानिमित्त भारतीय जनता पार्टी, धाराशिव शहराच्या वतीने गौरी सजावट स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. आमदार रणाजगजीतसिंह पाटील यांच्या प्रेरणेने व सौ अर्चनाताई रणाजगजीतसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडणार आहे.या स्पर्धेचे आयोजन भाजप शहराध्यक्ष अमित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
या स्पर्धेसाठी आकर्षक पारितोषिकांची तरतूद करण्यात आली आहे. त्यात प्रथम क्रमांकासाठी 11 हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 7 हजार रुपये तर तृतीय क्रमांकासाठी 5 हजार रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. याशिवाय उर्जानाथ 2,100 रुपयांची पाच बक्षिसे तसेच सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

स्पर्धकांनी आपल्या महालक्ष्मी समोरील आरुष सजावट देखावे यांचे वेग वेगळ्या अँगल मधील उच्च प्रतीचे तीन ते चार फोटो एका सेल्फीसह स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी आपल्या गाेरी सजावटीचे सुंदर फोटो व्हॉट्सॲपद्वारे ८३०८१९९५१६ व ८८०५०५०८०८ या क्रमांकावर पाठवावेत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
स्पर्धेतील नियमांनुसार केवळ घरातील गाेरी सजावटच ग्राह्य धरली जाणार असून, मूर्ती, देखावे व समाजकार्याचे फोटो ग्राह्य धरले जाणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. शहरातील गणेशोत्सवात उत्साहाची उधळण होऊन पारंपरिक व धार्मिक वातावरण वृद्धिंगत व्हावे यासाठी या स्पर्धेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभेल, असा विश्वास आयोजक अमित शिंदे यांनी व्यक्त केला आहे.