धाराशिव – समय सारथी
धाराशिव येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करीत 40 किलो गांजासह आरोपीना अटक केली असुन या गांजाची किंमत 8 लाख रुपये इतकी आहे. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, सपोनि सचिन खटके, पोह हुसेन सय्यद, अश्विन जाधव, प्रदिप वाघमारे, मपोह शोभा बांगर, पोना नितीन जाधवर, बबन जाधवर, पोअं योगेश कोळी चालक पोह महेबुब अरब, संतोष लाटे, चालक पोअं प्रशांत किवंडे यांच्या पाठकाने ही कारवाई केली.
धाराशिव जिल्ह्यातील मालाविषयक गुन्हेह्यातील आरोपीचा शोध घेवून मालाविषयक गुन्हे उघड व अैवधधद्यांवर कारवाई करणे काम पेट्रोलिंग करत असताना पथकास गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, चार इसम हे त्यांचे मोटर सायकलवर पांढऱ्या रंगाच्या पोत्यामध्ये गांज्या घेवून मोहा रोडने मनुष्यबळ पाटीकडे येथे येणार आहे. खात्रीलायक बातमी मिळाल्यावरुन नमुद पथक व सोबत पोलीस ठाणे कळंब येथील पोलीस निरीक्षक सानप, सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे, पोह तांबडे, पोह जाधव, पोना शेख, पो तारळकर फॉरेसीक व्हॅन व दोन पंचासह यांनी पोलीस उपविभागीय अधिकारी कळंब संजय पवार यांचे आदेशाने रवाना होवून मोहा रोड येथे बालाजी छगन काळे यांचे शेत गट नं 674 चे लगत आसलेल्या सार्वजनिक रोडवर चार इसम त्यापैकी दोन इसम हे स्कुटी व दोन इसम हे बुलेटवर येत असताना पथकास दिसले, त्यांना हात करुन थांबण्याचा ईशारा केला असता ते तेथुन पळून जात असताना पथकाने लागलीच त्यांचा पाठलाग करुन त्यापैकी दोन इसमांना पकडले आसता बुलेट वरील दोन इसम त्यांच्या ताब्यातील बुलेट व भरलेले पोते जागीच रोडला टाकून अंधाराचा फायदा धेवून तेथुन पळून गेले.
सुक्टीवरील पकडलेल्या इसमांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याची नावे सौरभ संजय काळे, वय 24 वर्षे, रा. इंदीरानगर कळंब, सोबत विधी संघर्ष बालक यांना पोत्यामध्ये काय आहे असे विचारपुस करता त्यामध्ये गांज्या आसल्याचे सांगून तो बालाजी छगन काळे, रा मस्सा(ख) ता. कळंब व संजय राजेंद्र उर्फ दादा काळे रा. मस्सा(खं) ता. कळंब यांचे कडून विकत घेतला असुन तो आम्ही जामखेड जि. अहमदनगर येथे विक्री करण्याकरीता घेवून जात असल्याचे सागिंतले.
आरोपीच्या ताब्यातील पोत्यातुन 20 पाकीटात मिळालेला एकुण 40 किलो 260 ग्रॅम वजनाचा एकुण 8,05,200₹ किंमतीचा गांजा मोटरसायकलसह असा एकुण 10,00,200₹ किंमतीचा माल जप्त करुन पोलीस ठाणे येथे एन. डी. पी. एस. कायदा कलम 8(क), 20(ब), 20(क) अन्वये गुन्हा नोदंवला असुन सदर गुन्ह्या अधिक तपास सहायक्क पोलीस निरीक्षक कांबळे पोलीस ठाणे कळंब हे करत आहेत.
सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन, संजय पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी कळंब यांचे मार्गदर्शनाखाली सथानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, पोलीस ठाणे कळंबचे पोलीस निरीक्षक सानप, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, कळंब पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे, पोह हुसेन सय्यद, अश्विन जाधव, प्रदिप वाघमारे, मपोह शोभा बांगर, पोना नितीन जाधवर, बबन जाधवर, पोअं योगेश कोळी चालक पोह महेबुब अरब, संतोष लाटे, चालक पोअं प्रशांत किवंडे पोह तांबडे, जाधव, पोना शेख, पोअं तारळकर यांच्या पथकाने केली आहे.