कळंब – समय सारथी, अमर चोंदे
धाराशिवच्या कळंब पोलिसांनी मोठी कारवाई करीत गांजाची शेती करणाऱ्याला अटक केली आहे. गांज्याची अवैध विक्रीसाठी लागवड व जोपासणी करणाऱ्या विरुध्द कळंब पोलीसांनी कारवाई केली आहे. कळंब पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवी सानप व त्यांचे पथकास गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाल्यावर ही कारवाई करण्यात आली.
डोळा पिंपळगाव शिवारातील शेत गट नं 105 येथे एक इसमाने त्याचे शेतात गांजा सदृश्य झाडांची लागवड करुन जोपासणा करीत आहे त्यावर पथकाने त्या ठिकाणी जावून छापा टाकाला असता अमर अंकुश टेकाळे हा त्याचे वडीलाचे शेतात गांज्या या अंमली वनस्पतीची लागवड केली होती. अवैध विक्री करण्याचे उद्देशाने झाडे लावून त्यांची जोपासणा करीत असताना पथकास मिळून आला. यावर पथकाने गांजा जप्त करुन अमर टेकाळे यांचे विरुध्द गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 कलम 8 (क), 20 (क) अन्वये कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
सदर कामगिरी ही पोलीस अधीक्षक संजय जाधव,अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन व कळंब उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पवार यांचे मार्गदर्शनाखाली कळंब पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक रवी सानप, मसपोनि पुंडगे, सपोनि मगर, पोलीस पो उपनिरीक्षक शिंदे, अंमलदार शिवाजी राऊत, मनोज दळवी,अजिज शेख, अमोल माळी,किरण माळी, फुलचंद मुंडे, आसाराम खाडे,साईनाथ आशमोड,म पो कॉ संजीवनी वडकर,चालक इरफान शेख यांचे पथकाने केली.