धाराशिव – समय सारथी
उमरगा तालुक्यातील कराळी येथील गावकऱ्यांना अन्नातून विषबाधा झाली असून हे रुग्ण विजय क्लिनिक तूरोरी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. रुग्णामध्ये लहान मुलापासून वृद्धांचा समावेश आहे, रुग्णाची संख्या 40 च्या आसपास असुन उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे असे डॉ विक्रांत शिंदे यांनी सांगितले. दरम्यान तालुका आरोग्य अधिकारी यांनी विजय क्लिनिक तुरोरी येथे भेट देऊन डॉ विजय शिंदे,डॉ विक्रांत शिंदे, यांना रुग्णाच्या प्रकृती विषयी चौकशी केली आहे.इतर रुग्णालयात देखील रुग्ण ऍडमिट केले असुन हा आकडा 100 च्या घरात आहेत.
कराळी गावात जागरण गोंधळ धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात गावातील लोकांनी उपस्थित राहून जेवण केले होते तेव्हापासून गावकऱ्यांना उलटी ,मळमळ,चक्कर येणे,अशी लक्षणे दिसताच एक एक करून तब्बल 40 रुग्ण विजय क्लिनिक तुरोरी येथे दाखल झाले आहेत. सर्व सोईयुक्त दवाखाना ग्रामीण भागात तुरोरी येथे उपचारासाठी उपलब्ध अनेकांना वेळेवर उपचार मिळाले,सध्या सर्व रुग्णाची प्रकृती स्थिर आहे, योग्य उपचार चालू आहे अशी माहिती डॉ विक्रांत विजय कुमार शिंदे (एम डी मेडीसीन) यांनी दिली आहे.