3 जागा महाविकास आघाडीच्या असल्याचा आमदार कैलास पाटील यांचा दावा
धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्हा मजूर फेडरेशनच्या निवडणुकीत भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे वर्चस्व पहायला मिळाले. 4 जागा बिनविरोध झाल्यानंतर 9 जागापैकी 8 जागावर विजय मिळवला. जिल्हा मजुर संघाच्या स्थापनेपासून डॉ पद्मसिंह पाटील यांचे वर्चस्व होते त्यानंतर त्यांचे पुत्र भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आपली सत्ता कायम ठेवली. 13 पैकी 12 जागा महायुतीच्या ताब्यात आल्या असा दावा आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी केला आहे तर 13 पैकी 3 जागा महाविकास आघाडीच्या असल्याचा दावा आमदार कैलास पाटील यांनी केला आहे. जागा वरून दावे प्रतिदावे केले जात आहेत.
2025-29 च्या पंचवार्षिक निवडणुक खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती.एक मतदार थेट दिल्लीहून विमानाने आणला होता मात्र आ राणाजगजितसिंह पाटील यांनी आखलेल्या रणनितिपुढे त्यांचे काही चालले नाही. या निवडणुकीत आ राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलचे 13 पैकी 12 उमेदवार निवडून आले. आ पाटील यांच्या गटाच्या चार जागा सुरुवातीला बिनविरोध निवडून आल्या होत्या. उर्वरित 9 जागासाठी निवडणूक झाली होती त्यात लोहाऱ्याची जागा महाविकास आघाडीने केवळ 1 मताने जिंकली व आ पाटील यांच्या पॅनल च्या 8 जागा मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या.