बाजारपेठ व चांगला भाव मिळुन शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती होणार
वाशी – समय सारथी
शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी देशभर फार्मिंग एअरपोर्टची संकल्पना पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य मंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी मांडली, शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ व चांगला भाव मिळु शकतो असे सांगत यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. देशात सर्वप्रथम ही योजना महाराष्ट्रात राबविण्याचा संकल्प ही त्यांनी यावेळी बोलून दाखविला. नुकतेच पालकमंत्री सावंत यांचे आदेशाने धाराशिव येथील हवाई धावपट्टीचे नूतनीकरण ही झाले आहे.
फार्मिंग एअरपोर्ट म्हणजे शेतकऱ्यांसाठी एअरपोर्ट तयार करणे, ही माझी संकलपना असुन ही भारतभर राबविन्यासाठी पंतप्रधान यांना लेखी पत्र व अहवाल पाठवले आहे. प्रत्येक जिल्ह्यात एक असे शेतकरी यांच्यासाठी एअरपोर्ट सुरु केले जाईल त्यातून इथले धान्य, दुध 24 तासात जगातील मार्केटमध्ये पोहचले व शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल.
गोडाऊन, कोल्ड स्टोरेज असे तयार करुन रोजगार उपलब्ध होणार आहे.कांदा, सोयाबीन भाव कमी जास्त होतात त्यामुळे जेव्हा भाव जास्त असतात तेव्हा धान्य व इतर वस्तू इतर ठिकाणी विकल्या तर आर्थिक प्रगती होईल. फार्मिंग एअरपोर्ट व इतर खर्च जरी गेला तरी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे. मला मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी शब्द दिला आहे की सरकार आल्यावर महाराष्ट्रात प्रथम फार्मिंग एअरपोर्ट सुरु करणार आहेत.
येत्या सहा महिन्यात धाराशिव जिल्ह्यात हक्काचे पाणी आणण्यासाठी आपण कटिबद्ध असून हे पाणी आल्यानंतर सिंचन क्षेत्रात मोठी वाढ होणार आहे. पाणी आल्यानंतर शेतकऱ्यांना विविध पिके घेता येतील व उत्पादित मालाला चांगला भाव देण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. स्थानिक बाजारपेठ बरोबर आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळाल्यास शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.