धाराशिव – समय सारथी
पवनचक्की कंपनी व शेतकरी यांच्यात पुन्हा मोठा संघर्ष पाहायला मिळत आहेत, शेतकऱ्यांनी अधिकारी यांना 24 तासापासून बसवून ठेवले असुन शेतकरी आक्रमक झाले आहेत. पवनचक्कीचे काम करायला गेलेल्या अधिकाऱ्यांचा शेतकऱ्यांनी रस्ता अडवला ठेवला असून काल सायंकाळपासून शेतकरी आणि अधिकारी शेतातच आहेत.
अधिकारी जाण्याच्या रस्त्यावर शेतकऱ्यांनी काल 6 वाजल्यापासून रास्ता रोको आंदोलन सुरु केले आहेत, अधिकाऱ्यांना पर्यायी रस्ता नसल्याने अधिकारी रात्रभर शेतातच बसून अडकून पडले आहेत. वाशी तालुक्यातील सारोळा गावातील घटना आहे, पोलीस व महसूल प्रशासन देखील घटनास्थळी दाखल झाले आहे.
शेतकऱ्यांचा कंपनीच्या कामाला विरोध आहेत.अगोदर केलेल्या कामाचा मोबदला आठ दिवसात देतो या अगोदर शेतकऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर आश्वासन दिले होते. आश्वासनाची पूर्तता न झाल्याने शेतकरी आक्रमक झाले असुन 24 तासापासून शेतकरी व कर्मचारी एकाच ठिकाणी बसून असुन मार्ग निघेना झाला आहे.