धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यात शेतकरी आत्महत्याचे सत्र सुरूच असुन धाराशिव तालुक्यातील वाखरवाडी येथील 55 वर्षीय शेतकरी पोपट पवार यांनी विष पिऊन आत्महत्या केली. त्यांच्या घरात 5 सदस्य असुन 3 एकर शेतजमीन आहे, कर्जबाजारीपणा व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीला कंटाळून त्यांनी जीवन संपवले, त्याच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु होते. आमदार कैलास पाटील हे रुग्णालयात पोहचले असुन त्यांनी कुटुंबाला आधार दिला आहे.