धाराशिव – समय सारथी
पिकांचे नुकसान, कर्जाचा डोंगर यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना धाराशिव जिल्ह्यातील जुनोनी येथे घडली आहे. 38 वर्षीय तरुण शेतकरी मुन्ना आयुब शेख याने आत्महत्या केली.
सततच्या पावसामुळे शेतातील पिकाचे झालेले नुकसान व वाढता कर्जाचा डोंगर या विवंचनेत शेतातील झाडाला गळफास घेतला त्यावेळी परिसरातील शेतकऱ्यांनी त्याला लगेच धाराशिव येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले परंतु डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले.
गेल्यावर्षी मयत मुन्नाचे वडील आयुब शेख पण दीर्घ आजाराने वारले होते त्यावेळी दवाखान्यासाठी खाजगी सावकाराकडून व बँकेचे पीक कर्ज असे 5 लाख रुपये कर्ज काढलेले होते.
यावर्षी तीन एकर कोरडवाहू शेतीमध्ये सोयाबीनची पेरणी केली होती परंतु सततच्या पावसामुळे सर्व सोयाबीन पाण्यात गेले आता लोकांचे पैसे कसे द्यायचे त्यात लेकरांच्या शिक्षणाचा खर्च, घर खर्च कसा भागवायचा यामुळे नैराश्याने मुन्नाने टोकाचे पाऊल उचलले. त्याच्या पश्चात आई,पत्नी, तीन मुली ,एक मुलगा,एक लहान भाऊ असा परिवार आहे.