धाराशिव – समय सारथी
धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांची सोलापूर महानगर पालिका आयुक्तपदी बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी शासनाने आणखी नेमणूक केलेली नाही. फेसबुक, व्हाट्स ऍप यासह अन्य सोशल मीडियावर तुकाराम मुंढे हे धाराशिवचे नुतन जिल्हाधिकारी म्हणुन नियुक्त झाल्याच्या व त्यांचे स्वागत, अभिनंदन करणाऱ्या पोस्ट व बातम्या येत आहेत. तूर्तास तरी धाराशिवच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती आदेश नाहीत.
तुकाराम मुंढे हे भारतीय प्रशासनिक सेवा (IAS) 2005 बॅचचे अधिकारी आहेत. तुकाराम मुंढे हे आता मुंबईत विकास आयुक्त (असंघटित कामगार) म्हणून नियुक्त आहेत. एक प्रामाणिक, दबंग, कडक शिस्तीचे,शिस्तप्रिय, ठोस पावले उचलणारे अधिकारी म्हणुन त्यांची ओळख आहे. 19 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांची 22 वेळा बदली झाली आहे. मुंढे यांनी महाराष्ट्रातील विविध महत्त्वाच्या पदांवर काम सोलापूर, पुणे, नागपूर, मुंबई, कल्याण येथे काम केले आहे. ते सचिव दर्जाचे वरिष्ठ अधिकारी आहेत, त्यांनी कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सचिव म्हणुन काम पाहिले आहे. त्यामुळे ते पुन्हा जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त होण्याची शक्यता नाही. मुंढे हे धाराशिवचे जिल्हाधिकारी म्हणुन नियुक्त अश्या बातम्या यापुर्वीही कौस्तुभ दिवेगावकर यांची बदली झाल्यावर आल्या होत्या, यानिमित्ताने एक मात्र नक्की आहे की मुंढे सारख्या अधिकारी यांची नेमणूक व्हावी ही धाराशिवकर यांची इच्छा आहे.
सचिव स्तरावर पदोन्नती – तुकाराम मुंढे सध्या वरिष्ठ IAS अधिकारी आहेत आणि त्यांनी अनेक वेळा महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे, जसे की महानगरपालिका आयुक्त, परिवहन आयुक्त, आणि सध्या ते सचिव दर्जाच्या पदावर कार्यरत आहेत. जिल्हाधिकारी पद हे साधारणतः कनिष्ठ IAS अधिकाऱ्यांसाठी असते. जिल्हाधिकारी ही साधारणतः 6 ते 10 वर्षांच्या सेवाकाळात असलेल्या IAS अधिकाऱ्यांसाठी असते. तुकाराम मुंढे यांना 15 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असल्याने त्यांची जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती होणे प्रशासकीय दृष्ट्या शक्य नाही असे सनदी अधिकारी सांगतात.
सचिव दर्जाचे वरिष्ठ अधिकारी जिल्हाधिकारी होऊ शकतात नाहीत. कारण सचिव (Secretary) आणि जिल्हाधिकारी (District Collector) हे प्रशासनातील वेगवेगळ्या दर्जाचे पदे आहेत आणि त्यांच्या पदोन्नतीची प्रक्रिया वेगळी असते. सचिव हे पदोन्नतीने वरिष्ठ स्तरावर गेलेले अधिकारी असतात तर जिल्हाधिकारी हे सहसा IAS अधिकाऱ्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यातील जबाबदारी असते. सचिव पदावरील अधिकारी परत जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त होणे हे प्रशासकीय संरचनेत सहसा शक्य होत नाही. अनुभवी IAS अधिकारी यांना सहसा सचिव, प्रधान सचिव किंवा अन्य महत्त्वाच्या धोरणात्मक पदावर नियुक्त केले जाते.
अपवाद व विशेष परिस्थिती –
कधी कधी विशेष परिस्थितीत, सरकार कोणत्याही अधिकार्याला विशिष्ट काळासाठी जिल्हाधिकारी पदावर नियुक्त करू शकते. मात्र, ही फारच अपवादात्मक परिस्थिती असेल तर हे शक्य असते मात्र असे आजवर झालेले नाही.