धाराशिव – समय सारथी
नगर परिषद प्रारूप मतदार यादीत घोळ झाल्याच्या तक्रारी नंतर त्यावर सुचना व हरकती घेण्यासाठी 27 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 13 ऑक्टोबर पर्यंत मुदत होती मात्र हा काळ कमी असल्याने व मोठ्या प्रमाणात घोळ असल्याच्या तक्रारी सर्वच राजकीय पक्षांनी केल्याने ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
राज्यातील 257 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा सुधारीत कार्यक्रम राज्य निवडणुक आयोगाने जाहीर केला आहे. प्रारुप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी वाढवण्यात आला असुन 17 ऑक्टोबरपर्यंत आहे. अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या अधिप्रमाणित करुन 31 ऑक्टोबर पर्यंत प्रसिध्द करणे. मतदान केंद्रांची यादी प्रसिध्द करणे आणि मतदान केंद्र निहाय मतदार याद्या 7 नोव्हेंबर रोजी प्रसिध्द केल्या जातील.