धाराशिव – समय सारथी
धाराशिव येथे हृदयद्रावक घटना घडली असुन उमरगा तालुक्यातील तलमोड येथे दारूबंदी अबकारी अधिकारी मोहन जाधव यांचा झेंडा वंदन करताना हृदय विकाराच्या तीव्र धक्याने मृत्यू झाला.
26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीचा कार्यक्रम सुरु असताना त्यांना अचानक अटॅक आला व जागेवर कोसळले. उमरगा तालुक्यातील तलमोड सीमा तपासणी नाक्यावर मोहन जाधव हे कार्यरत होते, ते मुळचे सोलापूर येथील रहिवासी आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत असुन हा क्षण कॅमेरात कैद झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.











