धाराशिव – समय सारथी
मी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा शिंदे गटाचा संभाव्य उमेदवार असुन महायुतीत पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याला विजयी करण्याची जबाबदारी दिली असल्याचे सांगत माजी खासदार रवींद्र गायकवाड यांनी उमेदवारीवर दावा ठोकला आहे. जागा शिंदे गटाला सुटली तर मी उमेदवार असेल असे त्यांनी सांगितले. गायकवाड यांची संपर्कप्रमुखपदी निवड झाल्यावर त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन कार्याला सुरुवात केली.
रवींद्र गायकवाड यांच्यावर कायम नॉट रिचेबल खासदार अशी टीका झाली त्यावर बोलताना गायकवाड म्हणाले की मी त्यावेळीही कायम नॉट रिचेबल होतो व आजही नॉट रिचेबल आहे. मी कायम नॉट रिचेबल असतो मात्र यापूढे संपर्कात राहण्याचा प्रयत्न करेल, तो शिक्का पुसणार आहे. बाळासाहेब ठाकरे असते तर माझे लोकसभेचे तिकीट कापले गेले नसते असा दावा त्यांनी केला. सध्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे काम समाधानकारक असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी लोकसभेची जबाबदारी दिली असुन मी ती उमेदवार विजयी करुन पार पाडणार आहे.पत्रकार परिषदेला जिल्हाप्रमुख मोहन पनूरे, सहसंपर्क प्रमुख अमर राजे परमेश्वर कदम, तालुका अध्यक्ष अजित लाकाळ सह पदाधिकारी उपस्थितीत होते.
शिवसेना शिंदे गटाकडून मी तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सुरेश बिराजदार दावेदार आहेत व भाजपणे अद्याप जाहीर केले नाही मात्र जागा वाटपात ज्याला उमेदवारी मिळेल त्याला निवडून आणू, मला उमेदवारी नाही मिळाली तरी निवडून आणणार असे ते म्हणाले. मी गावोगावी भेटी दिल्या असुन जनसंपर्क आहे असे ते म्हणाले.
मी त्यावेळी नॉटरिचेबल व आजही आहे. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे हे मला सांगायचे फोन ठेवा मात्र फोन ठेवल्याने सगळी कामे होतात असे नाही, ज्याचे काम असते तो माझा ड्राइवर, सोबतचा पदाधिकारी यांना फोन करायचा व त्याचे काम एसएमएस आल्यावर व्हायचे. काही जणांनी चुकीची माहिती दिल्याने तिकीट नाकारले त्यावेळी काय मानसिकता असेल मात्र मी बाळासाहेब यांचे विचार मानत असल्याने शिवसेना सोडली नाही. माझ्या घरातील सगळे काँग्रेसमध्ये असताना मी सेनेत गेलो.
मराठा आरक्षण मिळाले पाहिजे कारण गोरगरीब वंचित लोकांना शिक्षण व नौकरीत संधी मिळायला हवी. केंद्र सरकारने आरक्षणाबाबत निर्णय घ्यायला पाहिजे मात्र राज्य सरकारवर ढकलले जात आहे, राज्य सरकार काही मार्ग काढले, काय निर्णय होतो ते पाहू असे गायकवाड म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्या भोवतालच्या लोकांमुळे शिवसेना फुटली, त्यावेळी उद्धव ठाकरे बोलले असते तर एकनाथ शिंदेसह सर्वजण परत आले असते मात्र आता शिवसेना एकजुट होणे शक्य नाही.