भुम – समय सारथी
भुम परंडा वाशी विधानसभा मतदार संघांचे माजी आमदार राहुल मोटे हे शरद पवार यांची साथ साथ सोडत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करीत हाती घड्याळ बांधणार आहेत. मुंबई येथे राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयात आज 5 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. गेली अनेक महिन्यापासून त्यांच्या पक्ष प्रवेशाची चर्चा होती त्याचा अखेर मुहूर्त सापडला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने हा मोठा गेम चेंजर निर्णय असणार आहे, यामुळे राष्ट्रवादीला बळ मिळणार आहे.
परंडा मतदारसंघातून राहुल मोटेंनी पाच वेळा विधानसभेची निवडणूक लढवली. त्यात ते 2004,2009,2014 सलग तीन वेळा ते आमदार राहत विजयाची हॅट्रिक केली होती मात्र गेली 2 टर्म त्यांचा माजी आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी पराभव केला होता. 1985 व 1990 या 2 टर्ममध्ये महारुद्र बप्पा आमदार होते. 2019 च्या निवडणुकीत 32 हजार 902 तर 2024 च्या निवडणुकीत अवघ्या दीड हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी जनसंपर्क कायम ठेवला विधानसभा निवडणुकीत निवडून आल्यापासून गेली 9 महिने आमदार प्रा डॉ तानाजीराव सावंत हे मतदार संघात फिरकले नाहीत, त्यामुळे नाराजीचा सुर आहे. सावंत यांच्या बलाढ्य शक्ती विरोधात लढा द्यायचा असेल तर विरोधी पक्षात न राहता सत्ताधारी पक्षा सोबत जावे. सत्तेचे पाठबळ हवे असल्याने त्यांनी राष्ट्रवादी पक्षात जावे असा कार्यकर्ते यांचा आग्रह होता. शिवाय राहुल मोटे हे अजित पवार यांचे नातेवाईक असल्याने त्यांनी हा मार्ग स्वीकारला. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने रंगत येणार आहे.