धाराशिव – समय सारथी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिर संस्थान कार्यालयातून महत्त्वाच्या संचीकाच गायब प्रकरणी जिल्हाधिकारी तथा मंदीर संस्थानचे अध्यक्ष डॉ सचिन ओम्बासे यांनी चौकशी समिती नियुक्त केली आहे, या समितीने तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात फौजदारी गुन्हा नोंद करावा अशी मागणी होत आहे.
तुळजाभवानी देवीला राजे महाराजे यासह अन्य संस्थान यांनी अर्पण केलेली पुरातन नाणी आणि सोने चांदीचे दागिन्यांवर डल्ला प्रकरणसह, सीआयडी अहवाल संदर्भात महत्वाचे कागदपत्रे असलेल्या सचिका गायब झाल्या आहेत. संचिका गायब असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर त्याचा शोध घेतला जात आहे, त्यातील काही सापडल्या आहेत टर काही गायब आहेत.
मंदिरातील सुरक्षेच्या आणि गैरव्यवहाराच्या अशा महत्त्वाच्या 50 पेक्षा अधिक संचिका गायब झाल्याचे प्रकरण उघड झाले होते. त्यानंतर कर्मचाऱ्यांना नोटीस देखील काढल्या होत्या आता त्यांनी आपले म्हणे दिल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी ही चौकशी समिती नियुक्त केली आहे. पूर्वीच्या घोटाळ्यात अडकलेल्या आरोपींना वाचवण्यासाठी ह्या संचिका गायब केल्या नंतर आल्या व त्यातील काही बनवल्या गेल्याची चर्चा आहे. चौकशी समितीला 8 दिवसात अहवाल सादर करावा लागणार आहे त्यानंतर कारवाईची पुढील दिशा ठरणार आहे.