धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगरपरिषदेच्या विद्यमान मुख्याधिकारी वसुधा फड यांनी धाराशिव नगरपरिषद अंतर्गत लेखासंहिता २०१३ प्रकरण कामे अंतर्गत नियम १३८ प्रमाणे कार्यवाही करीता कामांचा छाननी तक्ता तयार करून विविध विभागातील बोगस बिले काढले असल्याची तक्रार आमदार सुरेश धस यांनी केली होती शिवाय याबाबत तारांकित प्रश्न उपस्थितीत केला होता. या तक्रारीची चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करावी अशी मागणी धस यांनी जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांच्याकडे केली होती त्यावर ओम्बासे यांनी घोष यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करुन त्यांच्या स्तरावर सदस्यांची नेमणूक करावी व चौकशी करुन वस्तूस्तिथीदर्शक चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे.