परंडा – समय सारथी
राज्याचे आरोग्यमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या संकल्पनेतुन परंडा येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यात सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नौकरी मिळाली असुन त्याना आधार व यानिमित्ताने संधी मिळाली. रोजगार मेळाव्यात 100 पेक्षा अधिक कंपन्या सहभागी झाल्या. इयत्ता 5 वी पास पासुन पदवीधर, पदवीत्तर तरुणांना यात नौकरीची संधी मिळाली. त्यातील काही तरुणांना मंत्री डॉ सावंत यांच्या हस्ते नेमणूक पत्र त्याच मेळाव्यात देण्यात आले.
तरुणांना चांगल्या पगाराची नौकरी मिळाल्याने त्यांना आधार मिळाला. मेळाव्यात सहभागी झालेल्या तरुणांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता व मुलाखत घेऊन तात्काळ नौकरी मिळाली. ग्रामीण भागातील अनेक तरुण शिक्षित व होतकरू असतात मात्र त्यांना नौकरीसाठी कुठे जायचे, कोणाशी संपर्क करायचा, मोठ्या शहरात राहून कुठे कंपनीचा शोध घ्यायचा, तिथे जागा उपलब्ध आहे का याची सहसा माहिती होत नाही त्यामुळे गुण व कौशल्य, जिद्द व मेहनत करण्याची चिकाटी असतानाही केवळ माहिती न मिळाल्याने संधी हुकते. अश्या तरुणासाठी तालुका पातळीवर रोजगार मेळावे आयोजित केल्याने संधी मिळाली आहे, आयुष्य बदलल्यामुळे तरुणांच्या चेहऱ्यावर हसू आले.