महिलांची नोंदणी अधिक – लाडकी बहीण ठरवणार नेत्यांचे राजकीय भविष्य
धाराशिव – समय सारथी
लोकसभेनंतर धाराशिव जिल्ह्यातील 4 मतदार संघात 20 हजार तर 2019 पासुन 5 वर्षात 81 हजार नवमतदारांची नोंद झाल्याची असुन यात पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांनी पुढे येत सर्वाधिक नोंदणी केली, त्यामुळे महिलांचे मतदान निर्णायक ठरणार आहे. लाडकी बहीण राजकीय नेत्यांचे भविष्य ठरवणार असुन 22 ऑक्टोबर पर्यंत नवीन मतदार यांची नोंदणी करता येणार आहे.
2024 लोकसभेला उमरगा मतदार संघात 3 लाख 10 हजार 703 मतदार होते ते 1 ऑक्टोबर पर्यंत 3 लाख 14 हजार असुन 3 हजार 512 मतांची वाढ झाली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 2 लाख 97 हजार 137 मतदार होते त्यात गेल्या 5 वर्षात 17 हजार 078 मतांची वाढ झाली आहे.
तुळजापूर मतदार संघात लोकसभेला 3 लाख 75 हजार 562 मतदार होते ते 1 ऑक्टोबर पर्यंत 3 लाख 81 हजार झाले असुन 5 हजार 643 मतांची वाढ झाली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 3 लाख 51 हजार 842 मतदार होते त्यात गेल्या 5 वर्षात 29 हजार 363 मतांची वाढ झाली आहे.
उस्मानाबाद मतदार संघात लोकसभेला 3 लाख 65 हजार 951 मतदार होते ते 1 ऑक्टोबर पर्यंत 3 लाख 72 हजार 881 झाले असुन 6 हजार 930 मतांची वाढ झाली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 3 लाख 53 हजार 36 मतदार होते त्यात गेल्या 5 वर्षात 19 हजार 845 मतदारांची भर पडली आहे.
परंडा मतदार संघात लोकसभेला 3 लाख 25 हजार 165 मतदार होते ते 1 ऑक्टोबर पर्यंत 3 लाख 29 हजार 211 झाले असुन 4 हजार 46 मतांची वाढ झाली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 3 लाख 13 हजार 937 मतदार होते त्यात गेल्या 5 वर्षात 15 हजार 274 मतदारांची भर पडली आहे.
2024 लोकसभेला उस्मानाबाद मतदार संघातील उमरगा, तुळजापूर, उस्मानाबाद व परंडा या 4 विधानसभा मतदार संघात 13 लाख 77 हजार 381 मतदार होते ते 1 ऑक्टोबर पर्यंत 13 लाख 97 हजार 512 असुन 20 हजार 512 मतांची वाढ झाली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत या 4 मतदार संघात 13 लाख 15 हजार 952 मतदार होते त्यात गेल्या 5 वर्षात 81 हजार 560 मतांची वाढ झाली आहे.
महिलांची पुरुषांपेक्षा अधिक नोंदणी – महिला ठरवणार सरकार
लोकसभा निवडणुक ते 1 ऑक्टोबर 2024 या काळात जिल्ह्यात 20 हजार 131 नवीन मतदारांची नोंदणी झाली त्यात 6 हजार 797 पुरुषांनी नोंदणी केली त्यापेक्षा दुप्पट म्हणजे 13 हजार 334 महिलांनी नाव नोंदणी केली. 2019 ते 2024 असे गेल्या 5 वर्षाची आकडेवारी पाहिली तर 81 हजार 560 नवीन मतदार नोंदणी झाली त्यातपण महिलांनी बाजी मारली. गेल्या 5 वर्षात 36 हजार 225 तर 45 हजार 315 महिलांनी नाव नोंदणी केली.