धाराशिव – समय सारथी
बलात्कार व विनयभंगाच्या आरोपातुन कळंब तालुक्यातील मलकापूर येथील श्री क्षेत्र दत्त मंदिर संस्थांनाचे एकनाथ सुभाष महाराज लोमटे यांची कोर्टाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. लोमटे महाराज यांचा मोठा भक्तगण असल्याने हे प्रकरण त्यावेळी राज्यभर गाजले होते. लोमटे यांच्या वतीने कळंब कोर्टात ऍड रवींद्र मैंदाड यांनी बाजू मांडत युक्तिवाद सादर केला. या निर्णयामुळे लोमटे महाराज यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
परळी येथील एका भाविक महिलेच्या तक्रारीवरून लोमटे महाराज यांच्यावर येरमाळा पोलिस स्टेशनमध्ये भादवी कलम 376, 354, 354 अ, 354 सी, 341, 323, 504, 506, 509, आयटी कायदा कलम 66 ई, 67 प्रमाणे विनयभंग व बलात्काराचा गुन्हा नोंद झाला होता त्यानंतर त्यांना जवळपास दीड महिन्यांनी पंढरपूर येथून अटक करण्यात आली होती.
28 जुलै 2022 रोजी मलकापूर येथील श्री क्षेत्र दत्त मंदिर संस्थांचे लोमटे महाराज यांच्या दर्शनासाठी परळी येथील 35 वर्षीय महिला मठातील दक्षिण मंडपात बसली असता महाराजांनी महिलेस प्रवचन हॉलच्या खोलीमध्ये बोलून प्रसादाच्या पेढ्यातून गुंगीचे औषध देऊन महिलेचा विनयभंग केला. शरीर संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत असल्याचा आरोप महिलेने केला होता मात्र तो कोर्टात सिद्ध करता न आल्याने निर्दोष मुक्तता केली.
सदर प्रकरणात युक्तिवाद कामी ॲड अमित लांडगे,ॲड सोनाली गुडे, ॲड श्रीकांत माळी, ॲड आकांक्षा माने, ॲड दीपा इंगळे, अजित कासार व सूरज घोडके, गौरी पवार यांनी सहकार्य केले.