धाराशिव – समय सारथी
लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी व सेक्ससाठी सुरुवातीला काही जणांनी ड्रग्ज वापरले आणि त्यातूनच तुळजापूर शहरात ड्रग्जचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला आहे. नशा व सेक्सच्या नावाखाली हळुहळु अनेक जन व्यसनांध झाले असुन ड्रग्जचा बाजार मांडून काहींनी आर्थिक फायदा कमावला, या पैशातून राजकारण आणि सत्तेचा फायदा घेत अवैध धंद्याला संरक्षण असे चक्र आहे. ड्रग्ज तस्करीत 35 पैकी 21 आरोपी फरार आहेत, त्यातील एकालाही अटक करण्यात आले नसुन शोध सुरु आहे. फरार आरोपी पैकी एकाने अटकपुर्व जामीनासाठी अर्ज केला आहे, फरार आरोपी पैकी काही जन मटका, जुगार, गुटखा तस्करीसह अनेक अवैध धंद्यात गुंतलेले असुन अनेक गुन्हे नोंद आहेत.
ड्रग्ज सुरुवातीला कोण आणले? त्याचा हेतू काय? व्यापार व गुंतवणूक कोण केली? कोणाला आर्थिक व इतर फायदा झाला ? कमावलेला पैसा कुठे गुंतवला? पेडलरचे जाळे कसे निर्माण केले व कोणाकोणाला व्यसनांध केले? कोणाचे शोषण केले? या सिंडीकेटचा मास्टर माईंड कोण ? यासह अनेक प्रश्नाचे कोडं यां फरार आरोपीना अटक केल्यावर सुटणार आहे. तस्करीचा ‘आका’ व ‘बोका’ कोण हे अजुन समोर आले नाही.
माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापु कणे, विनोद उर्फ पिटू विलास गंगणे, माजी सभापती शरद जमदडे,तस्कर इंद्रजीतसिंग उर्फ मिटू रणजीतसिंह ठाकुर,प्रसाद उर्फ गोटन कदम परमेश्वर, उदय शेटे, आबासाहेब गणराज पवार, अलोक शिंदे,अभिजीत गव्हाड, मुंबई येथील संतोष खोत व तुळजापूर येथील स्वराज उर्फ पिनू तेलंग, विनायक इंगळे,शाम भोसले,संदीप टोले,जगदीश पाटील,विशाल सोंजी, अभिजीत अमृतराव,दुर्गेश पवार,रणजित पाटील,नाना खुराडे व सोलापुर जिल्ह्यातील उपळाई येथील अर्जुन हजारे हे सर्व 21 आरोपी फरार असुन पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. काही आरोपी राजकीय पक्ष व नेत्यांशी संबंधित असल्याने पोलिसांवर दबाव व हस्तक्षेप असल्याचे अनेक वेळा समोर आले आहे.
पोलिस अधीक्षक संजय जाधव व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना मॅडम, तत्कालीन अपर पोलिस अधीक्षक गौहर हसन, उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख हे स्वतः यावर लक्ष ठेवुन आहेत. जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख हे सरकारच्या वतीने कोर्टात सक्षम बाजु मांडत आहेत. तामलवाडी पोलिस निरीक्षक गोकुळ ठाकुर हे तपास करीत आहेत. या सर्व टीमच्या तपासामुळे रॅकेटचा भांडाफोड झाला.