धाराशिव – समय सारथी
ड्रग्ज तस्करीत धाराशिव जिल्ह्यातील तुळजापुर व नळदुर्ग ही 2 ठिकाणे ड्रग्ज माफियाचा ‘अड्डा’ बनली आहेत, तस्कर व सेवन करणाऱ्यांची पाळेमुळे खोलवर रुजली असुन मुंबई, पुणे, सोलापुरसह राज्यभर कनेक्शन असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. नळदुर्ग व तुळजापूर ही 2 ठिकाणे हॉटस्पॉट असुन या ठिकाणावरून आरोपीना अटक करण्यात आले आहे. नळदुर्ग येथून 2 तर तुळजापूर शहरातून 6 जणांना अटक केली आहे तर 1 जण फरार आहे. तस्करीचे नळदुर्ग कनेक्शन सध्या कारवाईच्या रडारवर आहे, यापुर्वी नळदुर्ग येथे गांजा, गुटखा तस्करी गुन्ह्यात सहभागी असलेला काही जन ड्रग्ज तस्करीत सहभागी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ड्रग्ज तस्करीसाठी जे वाहन वापरण्यात आले तेही नळदुर्ग येथील असुन तेथील काहीजण यात गुंतले आहेत.

तुळजापूर येथील अमित उर्फ चिमू अशोकराव आरगडे व युवराज देविदास दळवी आणि नळदुर्ग येथील संदीप संजय राठोड या 3 आरोपीना 45 ग्रॅम ड्रग्ज असलेल्या 59 पुड्या ड्रग्जसह 14 फेब्रुवारीला तामलवाडी येथे रंगेहात अटक करण्यात आली, या गुन्ह्यात ज्या गाडीतून ड्रग्ज केले ती गाडी MH 25 R 5598 ही नळदुर्ग येथील आहे. मालक एक तर वापरणारा दुसरा अशी स्तिथी आहे. 2 आरोपी हे नळदुर्ग येथून अटक केले आहेत. तुळजापूर येथील स्वराज उर्फ पिंटू तेलंग हा फरार आहे. तुळजापूर येथून अमित उर्फ चिमू आरगडे व युवराज दळवी, सयाजी चव्हाण, सुमित शिंदे, ऋतूराज गाडे व संकेत शिंदे या 6 जणांना अटक केली आहे.
पोलिस अधीक्षक संजय जाधव व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना मॅडम , उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख हे स्वतः यावर लक्ष ठेवुन आहेत. जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख हे सरकारच्या वतीने कोर्टात सक्षम बाजु मांडत आहेत. तामलवाडी पोलिस निरीक्षक गोकुळ ठाकुर हे दिवसरात्र तपास करीत आहेत. ड्रग्ज तस्करीत आरोपींची संख्या 16 वरून 18 झाली आहे, त्यातील 2 जण पोलिसांच्या ताब्यात, 10 जण जेलमध्ये आहेत तर तुळजापूर येथील पिनू तेलंग व मुंबई येथील वैभव गोळे हे 2 जण फरार आहेत. 4 नावे पोलिसांनी गोपनीय ठेवत ती डायरीत नमुद केली आहेत.