तरुण पिढी अमली पदार्थांच्या विळख्यात – गुन्हेगारीत वाढ होत असल्याची भिती
परंडा – समय सारथी, किरण डाके
परंडा शहरासह तालूक्यात मागील काही दिवसापासुन ड्रग्स,अंमली पदार्थाचा पुरवठा होत आसुन तो त्वरीत बंद करण्यात यावा अशी मागणी माजी आमदार राहूल मोटे यांनी पोलीस अधिक्षक यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
पोलीस अधिक्षक यांना देण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे की, परांडा शहरात आणि तालुक्यात मागील काही दिवसांपासून ड्रग्स आणि तत्सम अंमली पदार्थांची तस्करी आणि पुरवठा मोठ्या प्रमाणात होत आहे त्यामुळे माफिया गँग तयार झालेल्या आहेत. या गँगच्या माध्यमातून एमडी ड्रग्स आणि तत्सम अंमली पदार्थांची वाहतूक,विक्री आणि तस्करी होत असून तरुण वर्ग नशेच्या विळख्यात सापडण्याच्या मार्गावर आहे. यावर वेळीच आवर घालून बंदोबस्त करावा केल्यास राज्याचे आणि देशाचे भविष्य असलेली तरुण पिढी उध्वस्त होण्याची शक्यता आहे. यासाठी पोलीस अधिक्षक यांनी याकडे तातडीने लक्ष द्यावे तसेच याचा बंदोबस्त करण्यासाठी विशेष उपाययोजना करावी अशी मागणी मोटे यांनी केली आहे. परंडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद ईज्जपवार हे काय कारवाई करतात याकडे परंडा शहरासह तालूक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.