Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

मौन सोडले, श्रेय घेतले – माझ्या माहितीवरूनच पोलिसांची कारवाई – आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचा दावा

समय सारथी by समय सारथी
February 21, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
1.9k
VIEWS

ड्रग्जची माहिती द्या, नावे गोपनीय ठेवु – आमदारांचे आवाहन, नागरिकांचे प्रतिप्रश्न – आधी तुम्ही ‘ती’ नावे सांगा 

धाराशिव – समय सारथी 

ड्रग्ज तस्करी प्रकरणी अखेर आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी मौन सोडले असुन त्यांच्या माहिती आधारे पोलीसांनी कारवाई केल्याचा दावा केला आहे. आमदार यांच्या माहितीमुळे जर ही कारवाई झाली असेल तर ते कारवाई झाल्यानंतर इतके दिवस गप्प का राहिले हा प्रश्न अनुत्तरीत आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्यासह तुळजापूरकर जनता रस्त्यावर उतरली असतानाही आमदार गप्प होते मात्र अखेर त्यांनी पोलिसांनी केलेल्या कारवाईचे श्रेय घेण्याची संधी सोडली नाही. जे चांगले झाले ते माझ्यामुळेच याचाच प्रत्यय यावेळी पुन्हा आला. ड्रग्ज तस्करी बाबत काही माहिती असल्यास नागरिकांनी त्याची माहिती द्यावी, नाव गोपनीय ठेवले जाईल असे आवाहन आमदार यांनी केले आहे मात्र त्यांच्या सोबत सावलीसारखे असलेले काही जण ड्रग्जचे सेवन करीत असल्याचा आरोप तुळजापूरकर करीत आहेत. आमदारांनी आधी ती नावे पोलिसांना दिली तर ड्रग्ज सेवन करणारे उघडे पडतील व त्यांना पुरवठा करणाऱ्यांना तस्करांना पोलीस शोधतील असा विश्वास जनतेला आहे. ड्रग्ज हा विषय राजकारण, श्रेयवाद याचा नाही याची जाणीव काही नेत्यांना यानिमित्ताने करावी लागते.

डिसेंबर महिन्यात ड्रग्ज विक्रीबाबत आपल्याला पहिली ठोस माहिती मिळाली, विषयाची दाहकता लक्षात घेत त्याची माहिती पोलीस अधीक्षक यांना दिली, त्यानंतर त्यांनी कारवाई केली असा दावा आमदार पाटील यांनी केला आहे. तुळजापूर शहरातील माता-भगिनींना आपण दिलेल्या शब्दानुसार  जिल्हा पोलीस अधीक्षकांना माहिती देत सूचना दिल्या. त्यांनीही गांभीर्याने दखल घेत प्रकरणाचे धागेदोरे लावण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरु केले. दुर्दैवाने दोन वेळा यश मिळाले नाही, परंतु तिसऱ्यांदा मात्र यश मिळाले. मुंबई आणि तुळजापूर शहरातील कोणाचे यात संबंध आहेत याचे अनेक पुरावे आता पोलिसांच्या हाती लागले आहेत. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी यात लक्ष घातले आहे. पोलीस सध्या सखोल तपास करीत असल्याने त्यावर अधिक बोलणे योग्य राहणार नाही.

आरोपी कोण आहे ? कोणत्या पक्षाचा आहे ? जवळचा आहे की दूरचा आहे याचा विचार न करता कोणाचीही गय केली जाणार नाही. याबाबत कोणाकडे आणखी माहिती उपलब्ध असेल तर त्यांनी न डगमगता आपल्याला कळवावे असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे. शहरवासीयांनी ड्रग्ज विरोधात पुकारलेल्या आंदोलनस्थळी शुक्रवारी भेट दिली. त्यांना वरील घडामोडींबद्दल अवगत करून यापूर्वीच्या घटनाक्रम सांगितला. विधानसभा निवडणुकीदरम्यान तुळजापूर शहरात बैठका घेत असताना शहरातील युवकांमध्ये ड्रग्ज सेवन मोठ्या प्रमाणात वाढत असल्याची आपल्याला माहिती मिळाली. याबाबत शहरातील माता-भगिनींनी मोठ्या कळकळीने भीती व्यक्त केली. तेंव्हा याविषयी प्राधान्याने कारवाई करण्याबाबत त्यांना आश्वस्त केले होते. तर नागरिकांनी त्यांच्याकडे याबाबत असलेली माहिती तात्काळ देण्याचे आवाहनही केले होते. 

28 डिसेंबर रोजी पहिल्यांदा आपल्याला याबाबत ठोस माहिती मिळाली. तातडीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना आपण अवगत केले. त्यानंतर त्यांची भेट घेऊन प्रकरणाची दाहकता त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी एका विशेष पोलीस पथकाची नियुक्ती करण्यात आली. जानेवारी महिन्यात प्रयत्न करूनही या पथकाच्या हाती म्हणावे तसे धागेदोरे लागले नाही. त्यानंतर 2 फेब्रुवारी रोजी आपल्याला आणखी माहिती मिळाली व ती आपण पोलीस अधिक्षकांना दिली. त्यानुसार त्यांनी साध्या वेशातील विशेष पोलीस पथक  पाठवले. अनेक तास वाट पाहिली, सापळा लावला मात्र कदाचित आरोपींना याचा सुगावा लागला असावा त्यामुळे यावेळीही पोलिसांना यश मिळाले नाही. मात्र यातील संशयित आरोपींवर पोलिसांनी पाळत ठेवायला सुरुवात केली. त्यांच्या सगळ्या हालचालींवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले होते. त्यानंतर 15 फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा माहिती मिळाली. यावेळी मिळालेल्या माहितीच्या आधारे तामलवाडी परीसरात पोलिसांनी यशस्वी कारवाई करीत ड्रग्जचा साठा जप्त केला व आरोपीना अटक केली. तोवर पोलिसांना ड्रग्स विक्रीच्या माहितीसह कोणीही निवेदन दिलेले नव्हते. 

पोलिसांनी स्वतः पुढाकार घेत मुंबई ते तुळजापूर अशी आरोपींची साखळी उघड केली आहे. अनेक महत्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती आले आहेत. प्रकरण तापसाधीन असल्याने त्यावर लगेच काही बोलणे योग्य राहणार नाही. मुंबई पोलिसांशी देखील आपण याविषयी बोललो आहोत. हा विषय आपल्या मुलाबाळांच्या भविष्याचा असल्याने यात जवळचा की दूरचा, पक्षाचा की विरोधातला असला विचार न करता कोणीही असो त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश आपण दिले असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

हे प्रकरण संवेदनशील आहे. हा आपल्या पुढील पिढीच्या भविष्याचा प्रश्न आहे. याबाबत आणखी  माहिती कोणाकडे उपलब्ध असेल तर त्यांनी ती आपल्याला कळवावी. यापूर्वी ज्यांनी माहिती कळवली  त्यांची नावे ज्याप्रमाणे गुप्त ठेवून कारवाई करण्यात आली अगदी त्याचप्रमाणे आपले नाव उघड होणार नाही याची जबाबदारी आपली असेल. दुर्दैवाने आपल्या परिसरात, कुटूंबात किंवा नातेवाईकांमध्ये असे काही प्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ आपण योग्य ती पावले उचलावी. सर्वांनी एकत्रित येऊन या संकटाला आळा घालणे अत्यावश्यक आहे. ज्याप्रमाणे तुळजापूरवासीय आज रस्त्यावर उतरून या बाबीचा निषेध नोंदवित आहेत, यापुढेही त्यांनी अशीच जागरूकता दाखविणे आवश्यक आहे. पोलीस प्रशासन प्रकरणाच्या खोलात घुसले आहे. यातील आरोपींची आता गय केली जाणार नाही. राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः यात लक्ष घातल्याने या प्रकरणाचा छडा लागल्याखेरीज राहणार नाही. आपण सर्वांनी सहकार्य केल्याशिवाय या विषारी विळख्याचे उच्चाटन होणार नाही. जोवर हे विष तुळजापुरातून समूळ नष्ट होत नाही तोवर सर्वांनी या विषयासाठी वेळ द्यावा असे आवाहनही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.

तुळजापूर शहरासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे

तुळजापुर येथील श्री तुळजाभवानी देवी मंदीराच्या विकास आराखडयास शासनाने मंजुरी दिली आहे. यासोबत धाराशिव-तुळजापुर- सोलापुर या रेल्वे मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे.आगामी काळात ही सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येणा-या भावीकांच्या संख्येत मोठी वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे श्री देवी मंदीर सुरक्षेच्या दृष्टीने व दर्शनासाठी येणा-या भावीकांच्या सोईसाठी  तुळजापुर येथील सध्याच्या पोलीस ठाण्याचे विभाजन करून तुळजापुर शहर व तुळजापुर ग्रामीण असे दोन स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी लवकरात लवकर मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, तुळजापुर मंदीर चौकीमध्ये पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिका-याची नेमणुक करून तेथेही अधिकचे मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, तुळजापुर शहरासाठी स्वतंत्र वाहतुक शाखा निर्माण करून, आवश्यकतेनुसार कर्मचारी व साहीत्यसामुग्री उपलब्ध करून देण्याची मागणी आपण राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना याबाबत रीतसर प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश दिले असल्याची माहितीही आ पाटील यांनी दिली.

Previous Post

वादग्रस्त – शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी परीक्षा केंद्रात जात काढले फोटो, 12 वीच्या परीक्षेतील प्रकार

Next Post

कै पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड – 4 आरोपींचा युक्तीवाद संपला, 3 आरोपी 27 फेब्रुवारीला कोर्टात बाजु मांडणार 

Related Posts

महाराष्ट्र

गंगणे पोलिसांचे खबरी – मोबाईल नंबरसह ‘टीप’, जबाब

June 12, 2025
महाराष्ट्र

राजकीय दबाव – पोलीस हातचे बाहुले, काही आरोपींना अभय, नेतृत्वाचे आभार

June 12, 2025
महाराष्ट्र

पोलीस कोठडी संपणार – ड्रग्ज गुन्ह्यात कोर्टात पुराव्यांची कसोटी, पोलिसांची सत्वपरीक्षा – तपासात हाती काय ?

June 12, 2025
महाराष्ट्र

पोलिसांची कोर्टात भुमिका – गंगणे यांचे पिटा सुर्वेसह 12 जणांशी आर्थिक व्यवहार, हे मुद्दे मांडले

June 12, 2025
महाराष्ट्र

आजन्म कारावासाची शिक्षा – 4 महिन्याच्या बाळावर लैंगिक अत्याचार, धाराशिव कोर्टाचा मोठा निकाल 

June 11, 2025
महाराष्ट्र

कोर्टाचा सवाल – पोलिसांचा खबरी तर मग मोबाईल गहाळ कसा ? मोबाईल सापडेना – पोलिसांचे अपयश

June 12, 2025
Next Post

कै पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड - 4 आरोपींचा युक्तीवाद संपला, 3 आरोपी 27 फेब्रुवारीला कोर्टात बाजु मांडणार 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

गंगणे पोलिसांचे खबरी – मोबाईल नंबरसह ‘टीप’, जबाब

June 12, 2025

राजकीय दबाव – पोलीस हातचे बाहुले, काही आरोपींना अभय, नेतृत्वाचे आभार

June 12, 2025

पोलीस कोठडी संपणार – ड्रग्ज गुन्ह्यात कोर्टात पुराव्यांची कसोटी, पोलिसांची सत्वपरीक्षा – तपासात हाती काय ?

June 12, 2025
June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp