धाराशिव – समय सारथी
ड्रग्जमधुन पैसा, पैशातून राजकारण आणि सत्तेची नशा असेच काही तुळजापुर येथे झाले आहे. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात ज्या राजकीय दिग्गजांना पोलिसांनी दीर्घ तपासाअंती आरोपी केली आहे त्याची पार्शवभुमी गुन्हेगारी व अवैध धंदे अशीच आहे. जुगार, मटका, गुटखा अश्या अवैध धंद्यापासुन ते ड्रग्ज तस्करी असा प्रवास आहे, अवैध धंदे व ड्रग्ज मधुन मिळवलेला पैसा राजकारणात वापरायचा व त्यातून सत्ता मिळवायची आणि सत्तेतुन अवैध धंद्याना राजकीय संरक्षण असे चक्र तुळजापुरात आहे. अवैध धंदे करायचे, त्यातून पैसा व पॉलिटिकल फंडिंग (निवडणुकीत रसद, पैसा वाटप) करुन सत्तेसोबत राहायचं हे गणित पक्के जमले व रुजले आहे. नगर परिषद असो की विधानसभा निवडणुक मताला हजाराचा भाव, मोठे सामाजिक कार्यक्रम, साडी, धान्य, वस्तू वाटप याचं अवैध मार्गाच्या पैशातुन करायचे. ड्रग्जमुळे तुळजापूर येथील सामान्य लोकांचे संसार धोक्यात व तरुण पिढी व्यसनाच्या आहरी गेली आहे. ड्रग्ज माफियाचा फायनान्सर व लाभार्थी कोण ? राजकीय पाठबळ कोणाचे ? आतातरी हे थांबणार का ? असे अनेक प्रश्न समोर आले आहेत.

माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापु कणे, नगराध्यक्ष पती विनोद उर्फ पिटू विलास गंगणे, माजी सभापती शरद जमदडे, माजी सभापतीचा मुलगा विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे ही आरोपींची नावे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या सोबत जोडली जात आहेत, हे सर्वजण आमदार पाटील यांच्यासोबत सावलीसारखे असत, गेली 2-3 वर्षात हे नेते त्यांना जोडले गेले त्यापुर्वी राष्ट्रवादी, काँग्रेस असा साईनुसार प्रवास होता. मात्र या सर्वांचा राजकीय फायदा आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनाच झाला. काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते सुद्धा थोड्या फार प्रमाणात या टोळीचे राजकीय लाभार्थी आहेत.
पोलिसांच्या जंत्रीनुसार मटका, गुटखा तस्करीसह अन्य गुन्ह्यात यांचा सहभाग आहे. आमदार पाटील यांना ड्रग्ज तस्करी बाबत 2-3 वर्षांपासुन माहिती होती त्यांनी कानाडोळा केल्याने तेही तितकेच दोषी आहेत. मतांच्या व बेरजेच्या राजकारणात दुर्लक्ष केले आणि भावी पिढीचे भवितव्य धोक्यात आणल्याचा आरोप होत आहे, त्यामुळे अजुनही वेळ गेलेली नाही.