धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यात 15 आरोपी फरार असुन त्यांच्या अटकेचे आदेश देण्यात आले असुन तामलवाडी पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेची पथके शोध घेत आहेत. या गुन्ह्याच्या तपासावर आपले लक्ष असुन नंतर अटक केलेल्या आरोपीच्या तपासाच्या अनुषंगाने पुरवणी दोषारोपपत्र न्यायालयात वेळेत पाठवले जाईल. फर्रा आरोपीना लवकरच अटक केले जाईल, उपलब्ध पुरावे व जबाब याच्या आधारे तपास सुरु आहे, मुंबई येथील साखळीचा तपास सुरु असुन कोणालाही सोडले जाणार नाही असे पोलिस अधीक्षक रितु खोखर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मकोका व फरार आरोपी संपत्ती जप्त करणे बाबत विचारविनिमय सुरु असुन कडक कारवाई केली जाणार असल्याचे त्या म्हणाल्या.
दरम्यान 3 जुलै रोजी 5 आरोपींच्या जामीन अर्जावर धाराशिव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश टी जी मिटकरी यांच्या कोर्टात सुनावणी होणार आहे, जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख हे बाजु मांडत आहेत. तस्कर गटातील फरार आरोपी उदय शेटे, सेवन गटातील जेलमधील आरोपी आबासाहेब पवार, सेवन गटातील फरार आरोपी जगदीश कदम पाटील व तस्कर गटातील जेलमधील रणजित पाटील यांच्या अर्जासह नियमित सुनावणी 3 जुलै रोजी होणार आहे. तर माजी सभापती शरद जमदाडे यांच्या अर्जावर 9 जुलै रोजी सुनावणी होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात 9 जणांनी जामीन अर्ज केले असुन त्यात विनोद उर्फ पिटू गंगणे, संगीता गोळे, अमित अरगडे, संदीप राठोड, राहुल कदम परमेश्वर, इंद्रजीत उर्फ मिटू ठाकुर, अभिजीत अमृतराव, पिनू तेलंग, विशाल सोंजी यांचा समावेश आहे. हे अर्ज सुनावणी स्तरावर प्रलंबित आहेत. तुळजापूर ड्रग्ज तस्करीत 38 आरोपी असुन त्यातील 22 जण अटकेत असुन 15 जन फरार आहेत तर अलोक शिंदे यांना अटकपुर्व जामीन मिळाला आहे. पोलिस अधीक्षक रितु खोकर व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना, उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गोकुळ ठाकुर हे तपास करीत आहेत.
फरार आरोपी (15) – माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापु कणे, इंद्रजीतसिंग उर्फ मिटू रणजीतसिंह ठाकुर, मुंबई येथील वैभव गोळे, प्रसाद उर्फ गोटन कदम परमेश्वर, उदय शेटे,अभिजीत गव्हाड, तुळजापूर येथील स्वराज उर्फ पिनू तेलंग, विनायक इंगळे,शाम भोसले,संदीप टोले,जगदीश पाटील,विशाल सोंजी, अभिजीत अमृतराव,दुर्गेश पवार व सोलापुर जिल्ह्यातील उपळाई येथील अर्जुन हजारे हे सर्व 15 आरोपी फरार असुन पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
अशी झाली अटक (22) – तुळजापूर येथील अमित उर्फ चिमू अशोकराव आरगडे व युवराज देविदास दळवी आणि नळदुर्ग येथील संदीप संजय राठोड या 3 आरोपीना 45 ग्रॅम ड्रग्ज असलेल्या 59 पुड्या ड्रग्जसह 14 फेब्रुवारीला तामलवाडी येथे रंगेहात अटक करण्यात आली. त्यानंतर या 3 आरोपीना ड्रग्ज पुरवठा करणारी मुंबई महिला तस्कर संगीता गोळेला 22 फेब्रुवारी,संतोष खोतला 27 फेब्रुवारी,तुळजापूर तालुक्यातील सराटी येथील विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे याला 28 फेब्रुवारीला अटक करण्यात आली. सोलापूरहुन ड्रग्ज खरेदी करणारे सयाजी चव्हाण, सुमित शिंदे, ऋतूराज गाडे व संकेत शिंदे या 4 जणांना 18 ग्रॅम ड्रग्ज असलेल्या 30 पुड्या ड्रग्जसह 4 मार्च रोजी अटक करण्यात आली. पुणे येथील सुल्तान उर्फ टिपू शेख व सोलापूर येथील जीवन साळुंके या दोघांना 23 मार्चला, राहुल कदम-परमेश्वर याला 24 मार्चला अटक केली त्या दिवशी 4 गोपनीय व नवीन 6 अशी 10 जणांची नावे उघड केली. गजानन हंगरकर याला 25 मार्चला अटक केली त्यानंतर पोलिसांनी कोर्टात 26 मार्चला नवीन 10 आरोपींची नावे जाहीर केली, त्यानंतर 15 एप्रिलला कोर्टात चार्जशीट दाखल करताना माजी नगराध्यक्ष संतोष कदम परमेश्वर यांना 36 वा आरोपी करण्यात आले.
तस्कर गटातील रणजीत रंगनाथ पाटील यांना 1 मे रोजी अटक केली त्यानंतर 16 मे रोजी माजी उपसभापती शरद जमदाडे यांना अटक केली. 17 मे रोजी आबासाहेब पवार याला पुणे येथून तर 19 मे रोजी नानासाहेब खुराडे याला ठाणे जिल्ह्यातील बदनापुर तालुक्यातील वांगणी येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. 29 मे रोजी शुभम नेप्ते या आरोपीला अटक केले त्यानंतर आरोपीची संख्या 37 झाली. 6 जुन रोजी विनोद गंगणे यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. 19 जुन रोजी सोलापूर येथून पिट्टा सुर्वे याला अटक करण्यात आली. 22 जुन रोजी माजी नगराध्यक्ष संतोष कदम परमेश्वर उर्फ मेंबर यांना अकलूज सोलापूर येथून स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली.