भुम- समय सारथी
राज्याचे आरोग्य मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे, सोनारी येथील काळभैरवनाथ याचे दर्शन घेतले व त्यानंतर भुम तहसीलदार कार्यालय येथे उमेदवाररी अर्ज दाखल केला. यावेळी भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गटासह महायुतीतील घटक पक्षाचे नेते, पदाधिकारी उपस्थितीत होते.
डॉ तानाजीराव सावंत यांना परंडा भुम वाशी मतदार संघातून महायुतीकडुन शिवसेना शिंदे गटाकडुन उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आज सकाळी तुळजापूर येथे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. आई तुळजाभवानीची मनोभावे पूजा करून समस्त महाराष्ट्रवासीयांच्या कल्याणासाठी मनोभावे प्रार्थना केली, यावेळी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थितीत होते.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत सावंत यांनी धाराशिवच्या राजकीय इतिहासात सर्वाधिक 1 लाख 6 हजार 674 मते घेऊन विक्रमी 32 हजार 902 मतांनी विजयी झाले होते त्यांनी सलग 3 टर्म आमदार राहिलेल्या राष्ट्रवादीचे राहुल मोटे यांचा पराभव केला होता. शिवजल क्रांती, आरोग्य, हरित, उद्योग, शेत रस्ते, सिंचन यात त्यांनी मोठे विकासकाम केले आहे.