धाराशिव – समय सारथी
शिवसेनेच्या नेत्या तथा विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे ह्या 3 एप्रिल रोजी धाराशिव जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. सकाळी 9 वाजता त्या तुळजापूर येथील. विश्रामगृहात तुळजाभवानी जीर्णोद्धार व विकास कामे यावर जिल्हाधिकारी व इतर अधिकारी यांच्यासोबत बैठक घेतील, त्यानंतर 11.30 वाजता धाराशिव येथे पुष्पक मंगल कार्यालय येथे शिवसेना पदाधिकारी बैठक व मेळावा घेतील. दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे भूकंपग्रस्त भागातील सामाजिक वनीकरण, दुष्काळ नियोजन उपाययोजना, कायदा सुव्यवस्था व अंमली पदार्थ विरोधी कार्यक्रम आढावा, ऊसतोड महिला कामगार योजना आढावा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय येथे 5.30 वाजता पत्रकार परिषद घेतील व त्यानंतर लातुरकडे प्रयाण करतील.