धाराशिव – समय सारथी
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अधिकारी वेळेवर उपस्थिती न राहिल्याने व काही अधिकारी गैरहजर असल्याने पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. ही लोकशाहीची थट्टा आहे का असे म्हणत त्यांनी खडेबोल सुनावत कान टोचले. यापुढे असे खपवून घेतले जाणार नाही असे म्हणत सुधारण्यास सांगितले. खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांनी सुद्धा याबाबत नाराजी व्यक्त केली.
पालकमंत्री, लोकप्रतिनिधी वेळेवर येऊन थांबतात, अर्धा तास होऊनही अधिकारी येत नाहीत, आम्हाला काही कामे नाहीत का ? असा बैठकीत सुर होता. वरिष्ठ अधिकारी, विभाग प्रमुख 11.30 पर्यंत वाट पाहूनही आले नाही त्यामुळे ते नाराज झाले. बैठकीची पुर्वकल्पना दिलेली असताना व नियोजन बैठक कार्यालय जवळ असतानाही अधिकारी येत नाहीत. प्रोटोकॉलवरून खासदार ओमराजे निंबाळकर यांनी चांगलेच धारेवर धरले. ऑनलाईन बैठक असल्याचे सांगितल्याने हा गोंधळ उडल्याचे त्यांनी सांगितले.
काही अधिकारी यांच्या या कृतीचा लोकशाहीत निषेध आहे, असे पुन्हा करू नये वेळेवर येणे अपेक्षित आहे, दुसऱ्यांदा असे होऊ नये असे पालकमंत्री म्हणाले.












