धाराशिव – समय सारथी
पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची 16 ऑक्टोबर रोजी सोमवारी सकाळी 11 वाजता बैठक होणार आहे. जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात ही बैठक होणार असुन 2023-24 या आर्थिक वर्षाचा सप्टेंबर अखेर पर्यंत झालेल्या खर्चाचा आढावा व विविध प्रस्तावित कामाच्या याद्याना मान्यता देण्यात येणार आहे.
कृषी,पशुसंवर्धन,वन,मत्स्य व्यवसाय,सहकार, ग्रामविकास,सामान्य शिक्षण,क्रीडा, तंत्र शिक्षण,आरोग्य विभाग,पाणी पुरवठा व स्वच्छता,नगर विकास,सामाजिक न्याय,महिला बालविकास,पोषण,माहिती प्रसिद्धी,लघु पाठबंधारे व स्थानिक स्तर,ऊर्जा,महावितरण,उद्योग व खाणकाम,रेशीम उद्योग,परिवहन,गृह पोलिस,नियोजन, यात्रा,पर्यटन विकास,नावीन्यपुर्ण योजना,मुख्यमंत्री ग्रामसडक योजना,शासन आपल्या दारी व मराठवाडा मुक्तीसंग्राम महोत्सव यावर केलेल्या मंजुर निधीचा आढावा घेतला जाणार आहे.
धाराशिव जिल्ह्यासाठी 340 कोटी रुपयांचा निधी मंजुर असुन 72 कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असुन 44 कोटी 41 लाख रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे त्यापैकी 7 कोटी 76 लाख खर्च झाले आहेत.