धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या विकास निधीच्या काम वाटपाबाबत आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी तोंडी तक्रार केली त्यानंतर मी स्थगितीचे पत्र दिले.माझ्या पत्राचा उल्लेख आहे, त्यांना चुकीचे वाटत असेल तर मी पत्र देतो असे म्हणालो म्हणुन मी पत्र दिल्याचा गौप्यस्फ़ोट पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी केला. याचे शासन स्तरावर निरासन होईल असेही ते पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले.
जिल्ह्याच्या राजकारणात अश्या प्रकारचे राजकीय आढेवेढे, काही चुकीचे होत असेल तर त्याला मी जबाबदार नाही. मला जिल्ह्याचा विकास करायचा आहे, माझ्यावर दिलेले जबाबदारी पुर्ण करायची आहे. माझे स्पष्ट मत आहे की जर अश्या प्रकारची आडकाठी येत असेल तर ती योग्य नाही. मी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी बोललो आहे, लवकरच यावर तोडगा काढला जाईल.
268 कोटीच्या विकास कामांना स्थगितीवरून आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. निधी लॅपस होणार नाही, धाराशिवच्या जनतेवर अन्याय होऊ देणार नाही असे पालकमंत्री म्हणाले. झारीतला शुक्राचार्य कोण ? व का स्थगिती दिली हे लोकांना कळू द्या असे ओमराजे म्हणाले. सरकारने स्थगिती दिली आहे,ज्याला हौस आहे त्यांनी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांना विचारावे असा टोला आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी लागवला. नियोजन समिती कामाबाबत गंभीर आरोप, चुका झाल्याची माहिती आली आहे. ती जिल्हाधिकारी यांच्याकडे देऊन चौकशी करायची आहे, हे ठरले असल्याचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील म्हणाले.