धाराशिव – समय सारथी
धाराशिव शहरात श्रीराम जयंती निमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणुकीत मोठं मोठ्या डॉल्बी लावण्यात आल्या होत्या, या कर्णकर्शक आवाजाने आवाजाची डेसिबलची मर्यादा ओलांडली व मोठ्या प्रमाणात ध्वनीप्रदूषण झाले. धाराशिव शहर पोलिसात 5 स्वतंत्र गुन्हे नोंद करण्यात आले असुन डॉल्बी मालक यांची नावे व वाहन क्रमांक यांची नोंद घेण्यात आली आहे, परिवहन विभागाला हे वाहन क्रमांक कारवाईसाठी देण्यात येणार आहेत, या डॉल्बी मालकांना लाखो रुपयांचा दंड बसणार आहे. धाराशिव शहर एकेकाळी डॉल्बी मुक्त होते मात्र ते पुन्हा डॉल्बी युक्त झाले, नागरिकांनी पोलिसांकडे तक्रारी केल्यावर पोलिस अलर्ट मोडवर आले असुन कारवाईला सुरुवात केली आहे. धाराशिव शहर व जिल्हा डॉल्बी मुक्त ठेवणार असल्याचे पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी सांगितले.