धाराशिव – समय सारथी
नव्याने पदभार घेतलेले अधिष्ठाता डॉ शैलेंद्र चौहान यांनी प्रथमच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिव येथे Gala qurencia 24-25 वार्षिक स्नेहसंमेलन आयोजन केले. प्रथमच होणाऱ्या स्नेहसंमेलन छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह व जिल्हा क्रीडा संकुल धाराशिव येथे पार पडले.18 जानेवारीपासून सुरू झालेले चार दिवसाचे स्नेहसंमेलन कबड्डी ,बॅडमिंटन ,क्रिकेट ,चेस ,कॅरम आदि क्रीडा प्रकारामध्ये वैद्यकीय विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला . क्रीडा स्पर्धेच्या विजेत्यांना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून वसुधा फड मुख्याधिकारी नगरपालिका धाराशिव यांच्या शुभहस्ते व डॉक्टर शैलेंद्र चौहान व डॉ तानाजी लाकाळ यांच्या उपस्थितीमध्ये गौरविण्यात आले. या स्नेहसंमेलनात नृत्य, एकपात्री अभिनय ,कथाकथन ,रॅम्प वॉक आधी संस्कृतीक कार्यक्रम घेण्यात आले.विद्यार्थ्यांबरोबरच मा.अधिष्ठाता डॉ शैलेंद्र चौहान यांनी स्वतः गायन सादर करून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवला.डॉ योगेश गालफाडे ,डॉ आनंद वाडीकर ,डॉ प्रवीण डुमणे डॉ सौरभ पाटील डॉ स्वप्नील सांगळे डॉ स्वप्निल उगले डॉ शितल पिसाळ डॉ तृप्ती मांडे डॉ अनुजा कंदले डॉ अंजुम डॉ गणेश ताटे या अध्यापकांनी रॅम्प वॉक करून सहभाग नोंदवला.
डॉक्टर शैलेंद्र चौहान यांच्या दूरदर्शी नेतृत्वामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव येथे भव्य दिव्य कार्यक्रम पार पडला.हे स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी डॉ उज्वला गवळी, डॉ वि मुंडेवाडी – उपअधिष्ठता, डॉ विश्वजीत पवार, डॉ चारुशीला हलगरकर, डॉ महिंद्र धाबे, डॉ पुष्पा अग्रवाल डॉ चौरे डॉ लकदीर गायकवाड डॉ चेतन राजपूत यांच्यासह विद्यार्थी प्रतिनिधी परमेश्वर रासने व संजीवनी गुजर यांनी अथक परिश्रम घेतले.