धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठीच्या घडामोडीना वेग आला असुन महायुतीच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. पालकमंत्री प्रतापराव सरनाईक, आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली नेत्यांनी शिंदे यांची भेट घेतली यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख राजन साळवी, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, युवा नेते मल्हार पाटील उपस्थितीत होते.
अपक्ष निवडून आलेले धनंजय सावंत हे सुद्धा यावेळी सोबत होते. धनंजय सावंत यांनी आमदार डॉ तानाजीराव सावंत यांच्या विरोधात राजकीय बंड करून जिल्हा परिषद निवडणुक लढवली व ते बहुमताने निवडुन आले त्यानंतर त्यांनी भाजप शिवसेना युतीसोबत जाने पसंद केले. मल्हार पाटील व धनंजय सावंत यांची मैत्री इथे कामाला आली.
सावंत गट वगळता महायुतीचे सर्व जण एक झाले आहेत. शिवसेनेकडुन शहापुर गटातून निवडुन आलेले सुनील बनसोडे यांनी सुद्धा उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली, बनसोडे यांच्यासह इतरांना भाजपने आपल्या गटात नेहल्याचा दावा शिवसेना सावंत गटाने केला होता, त्यांना परत द्या नंतर बोलणी चर्चा करू असे म्हण्टले होते. मात्र सर्वजण एक असल्याचे समोर आले.
जिल्हा परिषद अध्यक्ष पदावर भाजपने दावा केला असुन अध्यक्षपदी अर्चना राणाजगजीतसिंह पाटील यांची निवड निश्चित मानली जाते.












